शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

महाबीज बियाणांसोबत इतर बियाणे खरेदीची सक्ती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 11:23 IST

Agriculture News : भरारी पथकाने ८ जून रोजी दधिमधी कृषी केंद्रावर कारवाई केली आणि पंचनामा करून अहवाल परवाना अधिकाऱ्याकडे पाठविण्यात आला.

तेल्हारा : येथील कृषी सेवा केंद्राचे संचालकांकडून शेतकऱ्यांना सोयाबीन बियाणांसोबत कपाशी बियाणे घेण्याची सक्ती करण्यात येत असल्याची तक्रार तालुका कृषी अधिकाऱ्यांना प्राप्त झाली होती. त्यानुसार कृषी विभागाच्या भरारी पथकाने ८ जून रोजी दधिमधी कृषी केंद्रावर कारवाई केली आणि पंचनामा करून अहवाल परवाना अधिकाऱ्याकडे पाठविण्यात आला. आता या कृषी केंद्राविरुद्ध काय कारवाई होते. याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

शेतकरी रुपेश लासूरकर हे महाबीजचे सोयाबीन बियाणे खरेदी करण्यासाठी दधिमधी कृषी केंद्रावर गेले असता, त्यांना कृषी केंद्र संचालकाने महाबीज बियाणांसोबतच इतर बियाणे घेण्याची सक्ती केली. शेतकऱ्याने याबाबत कृषी विभागाकडे तक्रार केली. या तक्रारीनुसार कृषी विभागाच्या भरारी पथकाने बिलांची तपासणी केली असता, सोयाबीन व कपाशीचे बिल आढळून आले. भरारी पथकाने पंचनामा करून अहवाल परवाना विभागाकडे पाठविला. तालुका कृषी अधिकारी मिलिंद वानखडे, कृषी अधिकारी नरेंद्र राठोड, मंडळ कृषी अधिकारी उमेश कदम, कृषी सहायक अविनाश मराठे, वरिष्ठ लिपिक विठ्ठल बिहाडे यांच्या पथकाने कारवाई केली. परंतु आता पंचनामा व अहवालानुसार या कृषी केंद्रावर कृषी विभागाकडून काय कारवाई येते. याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

शेतकऱ्यांची बियाणे, कृषी केंद्रांबाबत काही तक्रार असल्यास, त्यांनी कृषी विभागाशी संपर्क साधावा. जास्त भाव किंवा लिंकिंगमध्ये शेतकऱ्यांनी फसू नये.

- मिलिंद वानखडे, तालुका कृषी अधिकारी, तेल्हारा

माझ्या कृषी केंद्रावर झालेली कारवाई अयोग्य आहे. संबंधित शेतकऱ्याने सोयाबीनसह इतर कपाशीचे बियाणे मागितले. मागणीनुसार बियाणे उपलब्ध करून दिले.

-सुरेश दायमा, संचालक कृषी सेवा केंद्र, तेल्हारा

टॅग्स :AkolaअकोलाMahabeejमहाबीजAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी