शहरं
Join us  
Trending Stories
1
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
2
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
3
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
4
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
5
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
6
UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...
7
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
8
Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला; पर्यटकांवर केला गोळीबार, २ जण जखमी
9
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?
10
दहशतवाद्यांनी आधी धर्म विचारला, नंतर झाडल्या गोळ्या, पहलगाम हल्ल्यातील जखमींचा धक्कादायक दावा   
11
'नरेंद्र मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेते', जेडी व्हेन्स यांनी केले पंतप्रधानांचे कौतुक...
12
IPL 2025: हर्षा भोगलेंना KKRच्या मॅचमधून मुद्दाम वगळलं? खुद्द त्यांनीच दिलं स्पष्टीकरण
13
तेव्हा सलग १७ वर्षे घटत होते सोन्याचे दर, झालं होतं एवढं स्वस्त, मात्र आता...  
14
जालना: बॉयफ्रेंडकडून बदनामीच्या धमक्या, १८ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य, मृतदेह कुठे सापडला?
15
टेबल फॅन खूपच खराब झालाय? स्वच्छ करण्यासाठी पाहा 'ही' सोपी पद्धत, पंखा दिसेल नव्यासारखा
16
नरेंद्र मोदींचं विमान सौदी अरेबियाच्या हवाई हद्दीत प्रवेश करताच घडलं असं काही, सारेच अवाक्
17
सलग सहाव्या दिवशी बाजार तेजीत बंद; 'या' बँकांच्या शेअर्सने खाल्ला भाव; कोणत्या सेक्टरमध्ये घसरण?
18
बापरे! सासू अन् जावयानंतर आता विवाहित महिला १५ वर्षाच्या मुलासोबत फरार, प्रकरण काय?
19
सोन्यानं पार केला १ लाखांचा टप्पा, शक्ती कपूरनं ३५ वर्षांपूर्वीच केलेली भविष्यवाणी; व्हिडीओ व्हायरल
20
'२३७ जागा मिळल्याचा माज करू नका, शिंदेंमुळे त्या मिळाल्या', शिवसेना आमदार कदमांचा अतुल सावेंवर पलटवार

अंगणवाडीची संपूर्ण माहिती ‘अ‍ॅप’वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2019 12:41 IST

अकोला : पोषण आहार वाटपातील घोटाळा रोखण्यासोबतच गावांतील अंगणवाड्यांची माहिती एका क्लिकवर शासनाकडे उपलब्ध करण्यासाठी राज्यातील २२ हजार अंगणवाड्यांना स्मार्ट मोबाइल फोन वाटप करण्यात आले.

अकोला : पोषण आहार वाटपातील घोटाळा रोखण्यासोबतच गावांतील अंगणवाड्यांची माहिती एका क्लिकवर शासनाकडे उपलब्ध करण्यासाठी राज्यातील २२ हजार अंगणवाड्यांना स्मार्ट मोबाइल फोन वाटप करण्यात आले. त्यामध्ये आधीच ‘कॉमन अ‍ॅप्लिकेशन सॉफ्टवेअर’(कॅस) उपलब्ध करून दैनंदिन माहिती भरण्यासाठीचे प्रशिक्षण अंगणवाडी सेविकांना देण्यात आले.जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाकडे अंगणवाडीतील सेवा तसेच बालकांच्या सर्व प्रकारच्या नोंदी घेण्यासाठी कॅस अ‍ॅप्लिकेशन तयार करण्यात आले. मोबाइलमध्ये ‘अ‍ॅप’सह सिमकार्ड उपलब्ध करण्याची योजना राज्य शासनाने चालू वर्षात सुरू केली. मोबाइल अ‍ॅक्टिव्हेट करून त्याद्वारे नोंदी घेण्याचे प्रशिक्षण जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांना नुकतेच देण्यात आले. १ जूनपासून मोबाइलमध्ये नोंदी घेण्यास सुरुवात होणार आहे. त्यासाठी राज्यभरात ३० हजार मोबाइल वाटप केल्याची माहिती आहे.दैनंदिन कामांमध्ये उपस्थित बालकांच्या नोंदी, लसीकरण, गृहभेटी, स्तनदा माता, गरोदर माता, किशोरी मुलींच्या आरोग्याच्या नोंदी, पोषण आहाराचे वाटप, बालकांचे वजन, उंचीच्या नोंदी करण्यासाठी १२ नोंदवह्यांतील माहिती अ‍ॅपमध्ये भरली जाणार आहे. ती आॅनलाइन केली जाणार आहे. ज्या गावांमध्ये इंटरनेटची गती हळू आहे, त्यांना माहिती अपडेट करण्यासाठी इंटरनेटची गती प्राप्त होईपर्यंत सूट देण्यात आली. गती मिळताच अ‍ॅपमध्ये भरलेली माहिती आॅनलाइन होणार आहे.एकात्मिक बालविकास प्रकल्पाच्या पर्यवेक्षिकांना चार टप्प्यांत प्रशिक्षण देऊन त्यांच्यामार्फत जिल्हा स्तरावर प्रशिक्षण देण्यात आले. अ‍ॅपमध्ये माहिती भरण्यासाठीचे प्रशिक्षण प्रत्येक जिल्हा परिषद स्तरावर ८ ते १२ मे दरम्यान अंगणवाडी सेविकांना देण्यात आले.- इंटरनेटसाठी ८०० रुपयेअंगणवाडी सेविकांना मोबाइल देतानाच इंटरनेट सुविधेच्या खर्चासाठी निधी दिला जाणार आहे. सहा महिन्यांचा खर्च म्हणून ८०० रुपये दिले जातील.- अंगणवाडी उघडतानाचा फोटोविशेष म्हणजे, सेविकांना दैनंदिन अंगणवाडी उघडतानाचा फोटो अ‍ॅपवर टाकावा लागणार आहे. त्यामध्ये वेळेची नोंदही आपोआप होणार आहे. सोबतच अंगणवाडीत उपस्थित बालकांसोबत सेल्फी काढून तोही टाकावा लागणार आहे. यामुळे अंगणवाडी उघडण्याची वेळ, उपस्थित बालकांची संख्या, सर्वेक्षणाच्या माहितीमध्ये पारदर्शकता येणार आहे.जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांना अ‍ॅपमध्ये माहिती अपलोड करण्याचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. त्यांना मोबाइलचे वाटपही सुरू आहे. ठरल्यानुसार अ‍ॅपद्वारे नोंदणी सुरू होईल.- विलास मरसाळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, महिला व बालकल्याण, जिल्हा परिषद.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola ZPअकोला जिल्हा परिषदEducation Sectorशिक्षण क्षेत्रMobileमोबाइल