शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकमत इम्पॅक्ट: गणेश मंडळांना मोठा दिलासा, मंडपासाठीच्या खड्ड्यांचा दंड १५ हजारावरुन २ हजारावर  
2
मालेगाव बॉम्ब स्फोट: "तपास यंत्रणा शंकेपलीकडे आरोप सिद्ध करू शकत नसतील, तर..."; खासदार देसाई काय बोलले?
3
हिंदूही दहशतवादी असू शकतात! मालेगाव निकालानंतर काँग्रेसच्या ज्येष्ठ महिला नेत्यानं मांडलं स्पष्ट मत 
4
पाकिस्तानशी मोठी डील करून डोनाल्ड ट्रम्प यांचा दुहेरी निशाणा; भारतासह चीनलाही दिला संदेश?
5
औषधांचा साठा संपला, उपकरणांमध्येही बिघाड; कुर्ला येथील भाभा रुग्णालयातील रुग्णांचे हाल!
6
बाजारात मोठी घसरण! निफ्टी अडीच टक्क्यांहून अधिक खाली, अदानी-टाटांना सर्वाधिक फटका
7
२५% टॅरिफवर भडकले भारतीय व्यावसायिक; कोणी दिला ट्रम्प यांना अमेरिकन सामानावर बहिष्काराचा इशारा?
8
IPL 2026: केएल राहुल बनणार कर्णधार, २५ कोटीही मिळणार? 'या' संघाबद्दल रंगलीये चर्चा
9
व्हॉट्सअपवरील विनाकामाचे फोटो अन् व्हिडिओंनी भरला फोन, ही ट्रिक वापरून पहा; गॅलरी रिकामी राहील
10
अंतराळ क्षेत्रात एन्ट्री करण्याच्या तयारीत मुकेश अंबानींची रिलायन्स; 'या' कंपनीत मोठी गुंतवणूक करणार
11
आमिर-जुनैदनं रिक्रिएट केला 'अंदाज अपना अपना' मधील आयकॉनिक सीन, पाहा मजेशीर VIDEO
12
आज शितला सप्तमीच्या मुहूर्तावर सुरु करा रोज ५ मिनिटं शेगडी पूजन; अन्नपूर्णा होईल प्रसन्न!
13
"भगवा दहशतवाद म्हणणाऱ्यांनी हिंदूंची जाहीर माफी मागावी’’, एकनाथ शिंदेंची काँग्रेसवर टीका   
14
Video: विचित्र घटना; 'मौत का कुआं'मध्ये तरुण कोसळला; बाईक रायडरशिवाय तासभर धावत राहिली
15
चमत्कार! "मी वर तरंगत होते अन् माझं शरीर..."; १७ मिनिटांचा 'मृत्यू', महिलेसोबत काय घडलं?
16
'एक दिवस पाकिस्तान भारताला तेल विकेल'; अमेरिकेचा पाकिस्तानसोबत करार, डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?
17
तूर्त अभय! माणिकराव कोकाटेंना शनिदेवच पावला; अजित पवारांनी सुनावले, पण मंत्रीपद कायम ठेवले
18
IND vs ENG 5th Test India Playing XI : करुण नायरला 'वन मोअर चान्स'; टीम इंडियात ४ बदल
19
"काँग्रेसने संपूर्ण हिंदू समाजाची माफी मागावी..."; मालेगाव निकालावर CM फडणवीसांचं रोखठोक मत
20
हवेतच हेलकावे खाऊ लागले विमान, प्रवाशांचे प्राण संकटात, कर्मचाऱ्यांचा उडाला थरकाप, अखेर...

विहिरीतील गाळ काढण्याचा देयकात घोळ; मनपाचा अभियंता नीरज ठाकूरविरुद्ध पोलिसांत तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2019 13:28 IST

अकोला: प्रभाग क्रमांक १२ मध्ये जलप्रदाय विभागाचे कनिष्ठ अभियंता नीरज ठाकूर यांनी तीन विहिरींमधील गाळ काढण्याच्या मोबदल्यात अदा केल्या जाणाऱ्या देयकाच्या फाइलमध्ये घोळ केल्याची बाब महापालिका आयुक्त संजय कापडणीस यांच्या निदर्शनास आल्यानंतर अभियंता ठाकूरविरुद्ध सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.

अकोला: प्रभाग क्रमांक १२ मध्ये जलप्रदाय विभागाचे कनिष्ठ अभियंता नीरज ठाकूर यांनी तीन विहिरींमधील गाळ काढण्याच्या मोबदल्यात अदा केल्या जाणाऱ्या देयकाच्या फाइलमध्ये घोळ केल्याची बाब महापालिका आयुक्त संजय कापडणीस यांच्या निदर्शनास आल्यानंतर अभियंता ठाकूरविरुद्ध सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. ठाणेदार विलास पाटील यांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली असून, लवकरच गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची माहिती आहे.मार्च २०१८ मध्ये महान धरणात अत्यल्प जलसाठा उपलब्ध असल्याचे पाहून शहरातील संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी सत्ताधारी भाजपाने व प्रशासनाने समन्वय साधत १४ कोटींचा प्रस्ताव तयार केला होता. शासनाने या प्रस्तावाला कात्री लावत महत्त्वाच्या कामांचा समावेश करण्याचे निर्देश देत ३ कोटी २८ लाख रुपये निधी मंजूर केला होता. यामध्ये नवीन सबमर्सिबल पंप, हातपंप कार्यान्वित करणे, विहिरीतील गाळ काढून खोलीकरण करणे, नादुरुस्त सबमर्सिबल पंप दुरुस्तीचा समावेश होता. जलप्रदाय विभागामार्फत कंत्राटदारांनी सदर कामे केल्यानंतर या विभागातील कनिष्ठ अभियंत्यांनी प्रत्यक्ष कामाची पाहणी करून देयकांच्या फायली तयार केल्या. या कामांचे देयक प्राप्त व्हावे, या उद्देशातून सदर फायली मनपा आयुक्त संजय कापडणीस यांच्याकडे स्वाक्षरीसाठी सादर करण्यात आल्या होत्या. आयुक्त कापडणीस यांनी प्रभाग क्रमांक १२ मधील तीन विहिरींचा गाळ काढून खोलीकरण करण्याच्या फायली तपासल्या असता, संबंधित कनिष्ठ अभियंता नीरज ठाकूर यांनी मोजमापात घोळ केल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता अभियंता नीरज ठाकूर यांच्याविरोधात फौजदारी तक्रार दाखल करण्याचा आदेश जलप्रदाय विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेश हुंगे यांना शुक्रवारी देण्यात आला होता. त्यानंतर जलप्रदाय विभागाचे हरिदास गुलाबराव ताठे यांनी मानसेवी कनिष्ठ अभियंता नीरज ठाकूर याच्याविरुद्ध सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार दिली असून, पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाCity kotwali Police Stationसिटी कोतवाली पोलीस स्टेशनAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिकाCrime Newsगुन्हेगारी