शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

पाच मतदारसंघात काँग्रेसमध्ये उमेदवारीसाठी चुरस!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2019 14:47 IST

अकोला: विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात आघाडी होणार हे जवळपास निश्चित असले तरी काँग्रेस पक्षाने सर्वच मतदारसंघात उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात आघाडी होणार हे जवळपास निश्चित असले तरी काँग्रेस पक्षाने सर्वच मतदारसंघात उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे.जिल्ह्यात विधानसभेचे पाच मतदारसंघ असून, या मतदारसंघांसाठी काँग्रेस निरीक्षकांनी मंगळवारी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्यात. यावेळी ५० इच्छुकांनी मुलाखती देत आपल्या कार्याचा लेखाजोखा सादर केला.पक्ष निरीक्षक म्हणून बुलडाणा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा आमदार राहुल बोंद्रे, राहुल ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा काँग्रेसच्या पार्लेमेंटरी बोर्डने इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. सकाळी स्थानिक स्वराज्य भवनात अकोला पश्चिम मतदारसंघासाठी सुरू झालेल्या मुलाखती संध्याकाळपर्यंत चालल्या. यावेळी ५० उमेदवारांनी आपल्या कार्याचा लेखाजोखा पक्षश्रेष्ठींकडे सादर करून आपलीच उमेदवारी कशी योग्य आहे, याचे दावे केले. या मुलाखतींना जिल्हाध्यक्ष हिदायत पटेल, महानगरअध्यक्ष माजी आ. बबनराव चौधरी, कार्याध्यक्ष सुनील धाबेकर, माजी आमदार लक्ष्मणराव तायडे, नतीकोद्दीन खतीब, मदन भरगड, बाबाराव विखे पाटील, रामदास बोडखे, डॉ. सुभाष कोरपे, साधना गावंडे, पुष्पा देशमुख, महेश गणगणे, अंशुमन देशमुख, कपील रावदेव, देवेश पातोडे आदी उपस्थित होते.

पश्चिमसाठी सर्वाधिक; पूर्वसाठी अवघे चारअकोला पश्चिम या मतदारसंघासाठी काँग्रेसमधून सर्वाधिक इच्छुक आहेत. तब्बल १६ इच्छुकांनी पक्षाकडे उमेदवारीसाठी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी १४ इच्छुकांनी आज मुलाखती दिल्या. अकोला पूर्व मतदारसंघासाठी अवघ्या चार उमेदवारांनी दावेदारी केली आहे.यांनी दिल्या मुलाखती अकोला पश्चिम :- डॉ. जिशान हुसैन, विभा राऊत, साजिदखान पठाण, मदन भरगड, अविनाश देशमुख, रमाकांत खेतान, मोहम्मद नौशाद, सुरेश पाटील, अ. जब्बार अ. रहमान, बबनराव चौधरी, आकाश कवडे, चंद्रकांत सावजी, प्रदीप वखारिया.

अकोला पूर्व - दादाराव मते पाटील, अजाबराव टाले, विवेक पारसकर, गजानन आमले. 

अकोट - डॉ. संजीवनी बिहाडे, महेश गणगणे, बालकृष्ण बोंद्रे, डॉ. प्रमोद चोरे, अशोक अमानकर, प्रशांत पाचडे, संजय बोडखे, निनाद मानकर, रमेश म्हैसने, शोएबअली मिरसाहेब, डॉ. पुरुषोत्तम दातकर, श्याम भोपळे, मनीषा भांबुरकर.

मूर्तिजापूर - आशिष बरे, ब्रम्हदेव इंगळे, भूषण गायकवाड, देवीदास कांबळे, महेंद्र गवई. 

बाळापूर - प्रकाश तायडे, डॉ. रफीख शेख, चंद्रशेखर चिंचोलकार, श्रीकृष्ण अंधारे, सैय्यद एनोद्दीन खतीब, राजेश गावंडे, वामनराव देशमुख, डॉ. सुधीर ढोणे, अजहर इकबाल मजहर खान, सतीश पवार, पंढरी आडोळे, अजय ताथोड, विजय शर्मा, प्रवीण जैन, रामसिंग जाधव.

टॅग्स :Akolaअकोलाcongressकाँग्रेस