शहरं
Join us  
Trending Stories
1
Donald Trump Tariff News : ज्याची भीती होती तेच घडले! वॉलमार्ट अन् अमेझॉनसह अनेक कंपन्यांनी भारतातील ऑर्डर्स रोखून ठेवल्या
2
धनंजय मुंडेंनी मंत्रिपद स्वप्नातही पाहू नये, पुन्हा घेतले तर अजितदादांचा पक्ष संपेल: जरांगे
3
'निवडणूक आयोग मला शपथपत्र मागतो; मी संसदेत शपथ घेतलीये', राहुल गांधींचा पुन्हा हल्लाबोल
4
जंगलात रील बनवायला गेले अन् तोंड सुडवून आले! चार जण गंभीर; नेमकं काय घडलं?
5
मतचोरीचा आरोप, निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह; प्रेझेंटेशनवरून शरद पवारांचा राहुल गांधींना सल्ला
6
तिकडे उद्धव ठाकरे दिल्लीत, इथे नाराज पदाधिकाऱ्यांचे राजीनामे; ठाकरे गटात बाहेरच्यांची लुडबुड?
7
भारताच्या जमिनीवरून 'या' देशाच्या राष्ट्रपतींनी चीनला दिली थेट युद्धाची धमकी, काय घडलं?
8
लय भारी! Instagram युजर्सची धमाल; Repost, Maps, Friends फीचर्सचा मजेदार अनुभव
9
१४% आपटला हा शेअर, मजबूत Q1 निकालानंतरही जोरदार विक्री; यादरम्यान एक्सपर्टनं वाढवलं टार्गेट प्राईज
10
उद्धव ठाकरेंना राहुल गांधींच्या घरी मागे बसवलं? संजय राऊत म्हणाले, "आम्हाला स्क्रीन समोर बसून पाहताना..."
11
'शपथ पत्रावर सही करा नाहीतर देशाची माफी मागा'; निवडणूक आयोगाने राहुल गांधींना दिले दोन पर्याय
12
“उद्धव ठाकरे महाविकास आघाडीत गेल्यापासून राहुल गांधी मातोश्रीवर गेले का?”; भाजपाचा सवाल
13
पीएम मोदी मोठा निर्णय घेणार; अमेरिकेच्या ५० टक्के कर आकारणीबाबत मंत्रिमंडळाची बैठक
14
"मी विधवा झाली", पत्नीच्या डोळ्यासमोर पतीची हत्या; हुमा कुरेशीच्या वहिनीने सांगितलं काय घडलं?
15
Dhadak 2: मराठमोळ्या आदित्य ठाकरेची बॉलिवूडमध्ये एन्ट्री; तृप्ती डिमरीसोबत केली स्क्रीन शेअर
16
शरणू हांडेचं अपहरण करणारा 'तो' युवक आणि मास्टरमाईंड कोण?; गोपीचंद पडळकरांचा खळबळजनक आरोप
17
Kapil Sharma : "जो सलमानसोबत काम करेल तो मरेल", कॅफे गोळीबारानंतर लॉरेन्स गँगची कपिल शर्माला धमकी
18
३ दिवसांत ६०% पेक्षा जास्त तेजी; ८०० रुपयांचा शेअर आता १२९९ पार, तुमच्याकडे आहे का?
19
Duleep Trophy 2025 : ज्युनिअरच्या नेतृत्वाखाली कर्तृत्व दाखवण्यासाठी मैदानात उतरणार हे २ सिनियर्स
20
थरारक! गोपीचंद पडळकर समर्थकाचं फिल्मी स्टाईल अपहरण; पोलिसांच्या सतर्कतेमुळे वाचला जीव

कंपनी म्हणते, सर्व कामांची वर्कऑर्डर द्या!

By admin | Updated: December 28, 2014 00:59 IST

अकोल्यातील कापशी तलाव सौंदर्यीकरणाचा तिढा सभेत.

अकोला : कापशी तलावाच्या सौंदर्यीकरणासह शहरातील आठ जागांवर विकासकामे करण्यासाठी प्रशासनाने तांत्रिक सल्लागारपदी मुंबई येथील ह्यफोर्टरेसह्ण एजन्सीची निवड केली. कापशी तलाव वगळता इतर कामांसाठी कंपनीने सादर केलेले दर लक्षात घेता, मनपाने अद्यापपर्यंत कार्यादेश (वर्कऑर्डर) दिले नाहीत. कंपनीने मात्र सर्व कामांची वर्कऑर्डर द्या, असे पत्र मनपाला दिले असून, कंपनीचे दर पाहता, हा विषय मंजुरीसाठी सर्वसाधारण सभेसमोर ठेवण्याचे संकेत प्रशासनाने दिले आहेत. मनपाच्या मालकीच्या कापशी तलावाला पर्यटनस्थळ बनविण्यासाठी प्रशासन प्रयत्नरत आहे. १९७८ पासून शहरवासीयांना काटेपूर्णा प्रकल्पातून पाणीपुरवठा होत असल्याने कापशी तलावाची पाणीपुरवठा योजना ठप्प पडली. कापशी तलावाला पर्यटनस्थळ बनविण्यासाठी तत्कालीन आयुक्त चंद्रशेखर रोकडे यांनी केलेले प्रयत्न वादाच्या भोवर्‍यात सापडले होते. तत्कालीन आयुक्त डॉ. विपीनकुमार शर्मा यांच्या कालावधीत कापशी तलावाच्या सौंदर्यीकरणासाठी शासनाकडून मंजूर झालेले २५ कोटींचे अनुदान नियोजनाअभावी परत गेले. या सर्व बाबी ध्यानात घेता, आयुक्त डॉ. कल्याणकर यांनी कापशी तलाव व परिसराची पाहणी केली. तलावाच्या ठिकाणी सौंदर्यीकरण करण्यासाठी सामाजिक संस्थांना आवाहनदेखील केले. यानंतर कापशी तलावाच्या सौंदर्यीकरणासाठी तांत्रिक सल्लागार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया जारी करण्यात आली. ऑगस्ट महिन्यात निविदा प्रसिध्द केल्यावर नोव्हेंबर महिन्यापर्यंत निविदा उघडण्याची प्रशासनाने तसदीच घेतली नाही. डिसेंबर महिन्यात निविदा उघडल्यानंतर मुंबईतील ह्यफोर्टरेसह्ण नामक एजन्सीची निवड करण्यात आली. यामध्ये तलावाच्या सौंदर्यीकरणासह शहरातील मोक्याच्या आठ जागांवर विकास कामे करण्यासाठी कंपनीकडून तांत्रिक मार्गदर्शन मिळणार आहे. कापशी तलावाच्या सौंदर्यीकरणासाठी तांत्रिक सल्लागारसाठी फोर्टरेस एजन्सीची निविदा मंजूर करण्यात आली. मोक्याच्या आठ जागांवर विकासकामे करण्याचाही यामध्ये समावेश आहे. एजन्सीला वर्कऑर्डर देण्यावर प्रशासन विचाराधीन आहे. कामे लवकरच मार्गी लागतील, असे मनपाचे कार्यकारी अभियंता जयप्रकाश मनोहर यांनी सांगीतले.