शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

अखेर कॅनॉल रस्त्याचा प्रस्ताव तयार करण्याचे आयुक्तांचे निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2019 16:12 IST

नगररचना विभागाने या मोजणी शिटची शोधाशोध सुरू केल्याची माहिती आहे.

- आशिष गावंडेअकोला: जुने शहरातील कॅनॉलच्या आरक्षणात बदल करण्याचा प्रस्ताव महापालिकेने शासनाकडे सादर न करता चार महिन्यांपासून गुलदस्त्यात ठेवल्याचा प्रकार ‘लोकमत’ने उघडकीस आणल्याची दखल घेत शुक्रवारी महापालिका आयुक्त संजय कापडणीस यांनी सदर प्रस्ताव तयार करून अवलोकनार्थ तातडीने सादर करण्याचे निर्देश नगररचना विभागाला दिले. यादरम्यान, कॅनॉलची मोजणी करणाऱ्या भूमी अभिलेख विभागाने मनपा प्रशासनाकडे २५ जून रोजी मोजणी शिट सादर केल्याचे समोर आले असून, नगररचना विभागाने या मोजणी शिटची शोधाशोध सुरू केल्याची माहिती आहे.भारतीय जनता पार्टीच्या लोकप्रतिनिधींनी गत पाच वर्षांत शहरातील रस्ते विकासाचा अनुशेष दूर करण्याच्या उद्देशातून शासनामार्फत कोट्यवधी रुपयांचा निधी आणला. त्यातून मुख्य रस्त्यांचे रुंदीकरण करण्यासोबतच प्रभागांमधील गल्लीबोळांमध्येही रस्त्यांची कामे केली जात असल्याचे चित्र आहे. एकीकडे शहरातील मुख्य रस्त्यांना प्राधान्य देण्याचे धोरण असतानाच दुसरीकडे जुने शहरातील अरुंद रस्त्यांच्या संदर्भात भाजपचे लोकप्रतिनिधी, महापालिकेतील सत्तापक्षाचे पदाधिकारी व प्रशासन उदासीन असल्याचे चित्र आहे. जुने शहरातील अवघ्या साडेपाच मीटर रुंदीच्या डाबकी रोडवर दिवसभर वाहतुकीची कोंडी कायम राहत असल्यामुळे या भागात पर्यायी रस्त्याची गरज आहे. त्याकरिता डाबकी रोड ते राष्ट्रीय महामार्गावरील नवीन किराणा बाजारपर्यंत ३ हजार ४०० मीटर लांबीच्या कॅनॉल रोडचा पर्याय उपलब्ध आहे. जुने शहरवासीयांना भाजप लोकप्रतिनिधी व मनपातील सत्ताधाऱ्यांकडून २०१४ पासून कॅनॉल रस्त्याचे गाजर दाखविल्या जात आहे, हे विशेष.२५ जून रोजी दिली मोजणी शिट!कॅनॉल रस्त्याच्या मोजणीसाठी मनपाने भूमी अभिलेख विभागाकडे २०१८ मध्ये शुल्क जमा केले होते. ही मोजणी मे महिन्यात पूर्ण होऊन २५ जून २०१९ रोजी मनपाकडे मोजणी शिट सादर केल्याचा दावा भूमी अभिलेख विभागाचे उपअधीक्षक योगेश कुळकर्णी यांनी केला आहे. अर्थात, भूमी अभिलेख विभागाने त्यांची जबाबदारी पार पाडली असली तरी दुसरीकडे नगररचना विभागाच्या लेखी मोजणी शिट सापडत नसल्याची माहिती असून, ती शोधण्यासाठी यंत्रणा कामाला लावण्यात आल्याची माहिती आहे.

२०१२ पासून रस्त्याला ग्रहण२०१२ मध्ये मनपातील भारिप-बमसंच्या तत्कालीन महापौर ज्योत्स्ना गवई यांनी कॅनॉल रस्त्याचे भूमिपूजन केले होते. त्यावेळी डांबरी रस्त्यासाठी अडीच कोटी रुपयांची तरतूद केली होती. प्रशासनाच्या लेटलतीफ कारभारामुळे निविदा प्रकाशित होऊनही कामाला सुरुवात होऊ शकली नाही. २०१४ मध्ये मनपात सत्ता परिवर्तन होऊन भाजपने सत्तेची सूत्रे स्वीकारली. तत्कालीन आयुक्त अजय लहाने यांनी २०१६ मध्ये कॅनॉल जमिनीच्या सातबाराच्या नोंदी पूर्ण करण्याचे काम हाती घेतले. ही प्रक्रिया २०१७ मध्ये पूर्ण झाली. २०१८ मध्ये तत्कालीन आयुक्त जितेंद्र वाघ यांनी कॅनॉलच्या आरक्षणात बदल करण्याच्या प्रस्तावाला सभागृहाची मंजुरी मिळविली. यावर मे २०१९ मध्ये प्रशासनाने हरकती, सूचना व आक्षेप बोलावले.कॅनॉलच्या आरक्षणात बदल करण्यासंदर्भात हरकती, आक्षेप व सूचना बोलाविण्यात आल्या होत्या. यामध्ये केवळ एक हरकत प्राप्त झाली होती. प्रशासकीय सोपस्कार पूर्ण केल्यानंतर आरक्षण बदलाचा प्रस्ताव लवकरच शासनाकडे सादर केला जाईल. तसे निर्देश नगररचना विभागाला दिले आहेत.-संजय कापडणीस,आयुक्त, मनपा.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका