शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीतील विटा शहर हादरले! रेफ्रिजरेटर-सिलेंडरच्या भीषण स्फोटात लग्नघरातील चौघांचा मृत्यू
2
रुपाली ठोंबरे पाटील, अमोल मिटकरींना अजित पवारांचा धक्का; राष्ट्रवादीच्या प्रवक्तेपदावरून हकालपट्टी
3
भोपाळमध्ये मॉडेल खुशबूचा संशयास्पद मृत्यू; आईनं लावला 'लव्ह जिहाद'चा आरोप, प्रियकराला अटक
4
आता घरबसल्या आधारकार्डमध्ये करा बदल; UIDAI कडून नवीन आधार अ‍ॅप लाँच, वैशिष्ट्ये पाहून शॉक व्हाल
5
लॅपटॉप चार्जर केबलवरचा 'तो' काळा गोळा कशासाठी असतो? अनेकांनी पाहिला असेल पण...
6
जे विष वापरून ट्रम्प यांच्या हत्येचा कट रचला, तेच विष बनवणाऱ्या डॉक्टरवर ATS ला संशय कसा आला?
7
'सैयारा' फेम अनीत पड्डा कॉलेजच्या अंतिम वर्षाची परीक्षा देणार, मग करणार 'शक्ती शालिनी'ला सुरुवात
8
तिरुपती लाडू घोटाळा: ५ वर्षात पुरवले ६८ लाख किलो बनावट तूप, टँकरचे लेबल बदलून केली फसवणूक
9
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या काही तासांत सुटली, लग्नाच्या पहिल्याच रात्री नवऱ्याचा मृत्यू
10
लेन्सकार्टच्या गुंतवणूकदारांना मोठा झटका! IPO ला बंपर प्रतिसाद, पण लिस्टिंगनंतर शेअर कोसळला
11
Manifestation: लाल पेन, पांढरा कागद, ११ नोव्हेंबरला इच्छापूर्तीसाठी Manifest करा ११:११ चे पोर्टल!
12
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
13
कारच्या 'हेजर्ड लाइट्स'चा वापर कधी करावा, कधी नाही? सुरक्षित ड्रायव्हिंगसाठी नियम माहीत आहेत का?
14
११ जिल्हे, ५९ सर्च ऑपरेशन, १० जणांना अटक; ४८ तास सुरू असलेल्या छाप्याची इनसाईड स्टोरी
15
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
16
'पंचायत' फेम जितेंद्र कुमारच्या आगामी सिनेमाची घोषणा, 'ही' अभिनेत्री साकारणार आईची भूमिका
17
“कोरेगाव प्रकरणात जमीन परत केली तरी पार्थ पवारांवर कारवाई झालीच पाहिजे”; काँग्रेसची मागणी
18
हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
19
"हे निर्लज्ज लोक तुमच्या यशातही..." गावसकरांनी विश्वविजेत्या लेकींसोबत शेअर केला आपला वाईट अनुभव
20
मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”

३० वर्षांपासून ‘ओपन स्पेस’चा व्यावसायिक वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2019 12:28 IST

अकोला: शहरातील प्रभाग क्रमांक १२ मधील सिव्हिल लाइन रोडवरील गोयनका ले-आउटमधील तब्बल १४ हजार चौरस फूट जागेचा मागील ३० वर्षांपासून व्यावसायिक वापर सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे.

- आशिष गावंडे

अकोला: शहरातील प्रभाग क्रमांक १२ मधील सिव्हिल लाइन रोडवरील गोयनका ले-आउटमधील तब्बल १४ हजार चौरस फूट जागेचा मागील ३० वर्षांपासून व्यावसायिक वापर सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. ले-आउटमधील खुल्या जागेचा व्यावसायिक वापर होत असेल तर संबंधित जागा ताब्यात घेण्यासाठी सत्ताधारी भाजपाने गतवर्षी पाच सदस्यीय समितीचे गठन केले होते. समितीने तीन महिन्यांत अशा जागांसंदर्भात प्रशासनाकडे अहवाल सादर केला होता. असे असताना गोयनका ले-आउटमधील ओपन स्पेसवर व्यावसायिक वापर कसा, असा प्रश्न उपस्थित झाला असून, सत्ताधारी भाजपकडून मर्जीतल्या व्यावसायिकांना पाठीशी घातले जात असल्याचा आरोप यानिमित्ताने होऊ लागला आहे.महापालिकेच्या नगररचना विभागाने मंजूर केलेल्या ले-आउटमध्ये परिसरातील नागरिकांच्या सार्वजनिक वापरासाठी किमान दहा टक्के जागा ‘ओपन स्पेस’ म्हणून राखीव ठेवावी लागते. ले-आउटमधील नागरिकांचा अधिकार लक्षात घेता त्या-त्या खुल्या जागांवर काही सामाजिक संस्थांनी धार्मिक स्थळे, प्रार्थना स्थळे उभारली. तसेच त्या ठिकाणी वयोवृद्ध नागरिकांना बसण्यासाठी व्यवस्था करून मुलांना खेळण्याची सुविधा उपलब्ध करून दिल्याचे चित्र आहे. यापेक्षा एक पाऊल पुढे जात काही शैक्षणिक संस्थांनी शाळा उभारून शैक्षणिक सुविधा निर्माण केल्या. याउलट काही संस्थांनी खुल्या जागेवर सौंदर्यीकरणाच्या नावाखाली लोकवर्गणीतून तसेच मनपाकडून मंजूर निधीवर डल्ला मारत विकास कामांना ठेंगा दाखवला. हा प्रकार कमी म्हणून की काय, मूळ विकासकाने त्याच्या ले-आउटमधील ओपन स्पेसवर चक्क व्यवसाय उभारल्याचे समोर आले आहे. एक-दोन नव्हे तर तब्बल ३० वर्षांपासून ओपन स्पेसला दडवून ठेवत त्यावर व्यवसाय सुरू ठेवल्याचा प्रकार भाजपाचे नगरसेवक अजय शर्मा यांनी चव्हाट्यावर आणला आहे. प्रभाग क्रमांक १२ मधील सिव्हिल लाइन रोडवरील गोयनका ले-आउटमध्ये नागरिकांच्या सार्वजनिक वापरासाठी १४ हजार चौरस फूट जागा ओपन स्पेस म्हणून आरक्षित आहे. सदर जागा व्यावसायिकाच्या ताब्यातून परत घेत नागरिकांच्या सार्वजनिक वापरासाठी खुली करण्याची मागणी नगरसेवक अजय शर्मा यांनी मनपा आयुक्त संजय कापडणीस यांच्याकडे लावून धरली आहे.३० वर्षांपासून ओपन स्पेसचा व्यावसायिक-जोडअधिकारांचे हनन करू नका!ले-आउटमधील खुल्या जागांवर स्थानिक रहिवाशांचा अधिकार असल्यामुळे यासंदर्भात स्थानिक स्वराज्य संस्थांनी धोरणांत बदल करावा. सर्वसामान्य नागरिकांच्या अधिकारांचे हनन करू नका, असे स्पष्ट निर्देश औरंगाबाद उच्च न्यायालयाने नगर विकास विभागाला दिले आहेत, हे येथे उल्लेखनीय.भाजपाची समिती वादाच्या भोवºयातवैयक्तिक स्वार्थापोटी खुल्या जागा ताब्यात ठेवून त्यावर व्यवसाय उभारणाºया संबंधित संस्थांचे करारनामे रद्द करण्याचा निर्णय सत्तापक्ष भाजपाने घेतला होता. मार्च २०१८ मध्ये मनपाच्या सर्वसाधारण सभेत तसा ठराव मंजूर करून संपूर्ण शहरातील खुल्या जागांचा अहवाल सादर करण्यासाठी पाच सदस्यीय समितीचे गठन केले होते. त्यावेळी प्रभाग क्रमांक १२ मधील गोयनका ले-आउटमधील खुली जागा समितीच्या निदर्शनास आली कशी नाही, असा सवाल उपस्थित झाला आहे.यांचा होता समावेश!प्रशासनाच्या मदतीने शहरातील संपूर्ण खुल्या जागांची माहिती घेऊन अहवाल सादर करण्यासाठी गठित करण्यात आलेल्या पाच सदस्यीय समितीमध्ये उपमहापौर वैशाली शेळके, गटनेता राहुल देशमुख, बाळ टाले, नगरसेवक डॉ. विनोद बोर्डे, मनपाचे तत्कालीन नगररचनाकार विजय इखार यांचा समावेश होता. 

भाग क्रमांक १२ मधील गोयनका ले-आउटमध्ये नागरिकांसाठी राखीव असणाºया खुल्या जागेवर व्यावसायिक वापर होत असल्याचे समोर आले आहे. ही जागा तातडीने ताब्यात घेऊन नागरिकांसाठी खुली केली जाईल.- संजय कापडणीस, आयुक्त, मनपा

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका