अकोला - सिटी कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सर्वोपचार रुग्णालयासमोर घरगुती गॅस सिलींडरचा व्यावसायीक वापर करणाऱ्या दोघांविरुध्द सिटी कोतवाली पोलिसांनी बुधवारी कारवाई केली. त्यांच्याकडून दोन सिलींडर व शेगडी जप्त करण्यात आली आहे.सर्वोपचार रुग्णालयासमोर योगेश लक्ष्मन भोजने रा. मोठी उमरी व राजेंद्र कीसनराव बुले रा. डाबकी रोड हे दोघे जन घरगुती सिलींडरचा व्यावसायीक वापर करीत असल्याची माहिती सिटी कोतवालीचे ठाणेदार विलास पाटील यांना मिळाली. त्यांनी पथकाला पाठवून सदर दोघांनाही ताब्यात घेउन त्यांच्याकडून दोन गॅस सिलींडर व शेगडी असा एकून १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई सिटी कोतवाली पोलिसांनी बुधवारी दुपारी केली.
घरगुती सिलिंडरचा व्यावसायिक वापर; दोघांविरुद्ध कारवाई, दोन सिलिंडर जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2019 18:36 IST