शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

‘चला बोलू या...स्किझोफ्रेनिया रुग्णांना भावनिक आधार देऊ या’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2018 13:14 IST

अकोला : मनुष्याला केवळ शारीरिकच नव्हे, तर मानसिक आजारही जडतात. या मानसिक आजारांमध्ये स्किझोफ्रेनिया  हा एक गंभीर आजार असून, या आजारामध्ये रुग्णांची मन:स्थिती ही दुभंगलेली असते.

ठळक मुद्देप्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ. एगन ब्ल्यूर यांनी २४ मे २००८ रोजी बर्लिन येथे स्किझोफ्रेनिया या विषयावर सर्वप्रथम माहिती सादर केली. तेव्हापासून दरवर्षी २४ मे रोजी जागतिक स्क्रिझोफेनिया हा दिन साजरा केला जातो.रुग्ण हा आपल्या कल्पनाशक्तीच्या बळावर एक वेगळे विश्व तयार करतो व त्यामध्ये तो रममान होऊन जगण्याचा प्रयत्न करतो.

अकोला : मनुष्याला केवळ शारीरिकच नव्हे, तर मानसिक आजारही जडतात. या मानसिक आजारांमध्ये स्किझोफ्रेनिया  हा एक गंभीर आजार असून, या आजारामध्ये रुग्णांची मन:स्थिती ही दुभंगलेली असते. असा आजार जडलेल्या रुग्णांकडे दुर्लक्ष न करता त्यांना भावनिक आधार गरजेचा असतो. औषधोपचार व समुपदेशन यांची योग्य सांगड घातल्यास या आजारातून स्किझोफ्रेनिया  रुग्ण मुक्त होऊ शकतो.प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ. एगन ब्ल्यूर यांनी २४ मे २००८ रोजी बर्लिन येथे स्किझोफ्रेनिया या विषयावर सर्वप्रथम माहिती सादर केली. तेव्हापासून दरवर्षी २४ मे रोजी जागतिक स्क्रिझोफेनिया हा दिन साजरा केला जातो. या आजारात रुग्णांची मन:स्थिती ही दुभंगलेली असते. थोडक्यात रुग्णांच्या विचार व वर्तनात मोठी तफावत असते. रुग्ण हा आपल्या कल्पनाशक्तीच्या बळावर एक वेगळे विश्व तयार करतो व त्यामध्ये तो रममान होऊन जगण्याचा प्रयत्न करतो. कोणीतरी माझ्या विरोधात आहे, कोणीतरी माझ्याविरुद्ध कट-कारस्थान रचतोय, अशा प्रकारचे भास व भ्रम रुग्णाला होतात. सतत एकांतात बसून पुटपुटणे, हातवारे करणे, कुटुंबातील व्यक्तींवर संशय घेणे, शिवीगाळ करणे, महिनोमहिने आंघोळ न करणे असे वर्तन या आजारात दिसून येते.१३ टक्के लोक मानसिक आजाराने ग्रस्त‘एनआयएमएचएएनएस’ने केलेल्या संशोधनानुसार १३.७ टक्के लोक मानसिक आजाराने ग्रस्त आहेत. यामध्ये स्किझोफ्रेनिया  व निराशेचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये पुरुषांचे प्रमाण जास्त आहे. १८ ते २५ या वयोगटातील व्यक्तींना हा आजार जडण्याची शक्यता जास्त असते.स्किझोफ्रेनियाची कारणेमानसिक ताणतणाव.जवळच्या व्यक्तीचे निधन.अमली पदार्थांचे अतिसेवन.काही प्रमाणात आनुवंशिकता.लक्षणेभ्रम व भास होणे.स्वत:शी पुटपुटणे.संशयी वृत्ती वाढणे.झोप न लागणे.विनाकारण चिडचिडेपणा येणे.विचित्र हातवारे करणे.उपचार महत्त्वाचायोग्य निदान व उपचारामुळे स्क्रिझोफनिक रुग्ण सर्वसामान्यांसारखे जीवन जगू शकतात. आधुनिक औषधोपचाराने ३० ते ४० टक्के रुग्ण पूर्णपणे बरे होतात, तर ३० ते ४० टक्के रुग्णांमध्ये मधून-मधून लक्षणे दिसतात. उर्वरित २० टक्के रुग्ण प्रतिसाद देत नाहीत. यामध्ये औषधोपचारांसोबतच समुपदेशनही महत्त्वाचे आहे. काही रुग्णांना ‘ई.सी.टी.’ (शॉक) हा उपचारही द्यावा लागतो. शिवाय, कुटुंबाचे सहकार्यही महत्त्वाचे आहे.स्क्रिझोफेनिया झालेल्या रुग्णांकडे अजिबात दुर्लक्ष न करता त्यांना भावनिक आधार देणे महत्त्वाचे असते. योग्य उपचार व समुपदेशन केल्यास हे रुग्ण सामान्य जीवन जगू शकतात.- अशोक जाधव, समुपदेशन सामाजिक कार्यकर्ता, जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय, अकोला.

 

टॅग्स :AkolaअकोलाHealthआरोग्य