शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

थंडी वाढणार; आठवड्यात करावा लागणार गार वाऱ्यांचा सामना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2020 13:40 IST

सध्या उत्तरेकडून थंड हवेचे वारे वाहत असल्याने विदर्भात थंडी वाढली असून, हे वातावरण आठवडाभर राहण्याची शक्यता आहे

अकोला : उत्तरेकडील गार वारे राज्याच्या दिशेकडे वाहत असल्याने विदर्भात थंडी वाढली असून, किमान सरासरी तापमान घटले आहे. हे थंड वारे आठवडाभर राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर नैसर्गिक थंडी वाढणार असल्याचा अंदाज कृषी हवामान शास्त्रज्ञांनी वर्तविला आहे. दरम्यान,१० जानेवारी सकाळी ८.३० वाजतापर्यंत राज्यात सर्वात कमी किमान तापमान गोंदिया येथे ८.२ अंश नोंदविण्यात आले.गत चोवीस तासांत शुक्रवार, १० जानेवारी सकाळी ८.३० वाजतापर्यंत विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट तर उर्वरित भागात किंचित घट झाली. शुक्रवारी दिवसभर गार वारे वाहत होते. त्यामुळे अकोल्याचे किमान तापमान घटून १०.७ अंशावर आले. बुलडाणा १०.२, वाशिम १०.२, अमरावती १०.०, यवतमाळ ११.०, वर्धा १०.४, नागपूर १०.१ तर चंद्रपूरचे किमान तापमान १२.५ अंश होते.सध्या उत्तरेकडून थंड हवेचे वारे वाहत असल्याने विदर्भात थंडी वाढली असून, हे वातावरण आठवडाभर राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर नैसर्गिक थंडी वाढणार असल्याची शक्यता कृषी हवामान शास्त्रज्ञ डॉ. आर. एन. साबळे यांनी वर्तविली आहे.

 

टॅग्स :Akolaअकोलाweatherहवामान