शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

ढगाळ वातावरणाचा खरीप, रब्बी पिकांना धोका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2019 11:07 IST

हरभरा पीक उत्तम आहे; परंतु त्यावरही घाटेअळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता वाढली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्ह्यात ढगाळ वातावरण निर्मिती झाली आहे, या वातावरणामुळे रब्बी व खरीप हंगामातील पिकांवर कीड, रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता वाढल्याने शेतकरी धास्तावला आहे. कापूस पिकांवरील बोंडअळीने पुन्हा डोके वर काढले असून, तूर, हरभरा पिकांना हे वातावरण पोषक ठरत आहे.यावर्षीच्या समाधानकारक पावसानंतर शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील पिकांची पेरणी केली आहे. तसेच खरीप हंगामातील कापूस, तूर आदी पिके शेतात उभी आहेत. तुरीला सध्या फुलांचा बहर व बहुतांश ठिकाणी शेंगा धरल्या आहेत. या वातावरणामुळे शेंगा पोखरणाºया अळ्यांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे, तर हरभºयावर घाटे अळीचा प्रादुर्भाव होऊ शकतो. तूर पीक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांना तूर पिकावर कीटकनाशक फवारणी करावी लागत आहे. हरभºयाची पेरणी उशिरापर्यंत सुरू होती.ज्यांनी नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हरभरा पेरणी केली. तेथील हरभरा पीक उत्तम आहे; परंतु त्यावरही घाटेअळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता वाढली आहे.सुरुवातीला मान्सून उशिरा पोहोचल्याने मूग, उडीद पीक हातचे गेले, नंतरच्या अतिपावसामुळे सोयाबीन काळे पडले आणि उत्पादनही घटले.कपाशीचेही उत्पादन कमी होत असल्याने शेतकºयांची भिस्त तूर व रब्बी हंगामातील पिकांवर आहे; परंतु पाऊस पाठ सोडत नसून, सारखे ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे फवारणीचा खर्च वाढण्याचीही शक्यता आहे.फळ पिकांवर परिणामविदर्भाच्या उत्तर भागावर थंड आणि बाष्पयुक्त वाºयाची धडक होत असल्याने सध्या पाऊस पडत आहे. ही परिस्थिती आणखी एक ते दोन दिवस टिकण्याची शक्यता आहे. त्यानंतर वातावरण मोकळे होऊन हळूहळू थंडीच्या प्रमाणात वाढ होण्याची दाट शक्यता आहे. पुढील दोन-तीन दिवस विदर्भात तुरळक ठिकाणी धुके पडण्याची शक्यता आहे. हे वातवरण असेच राहिल्यास फळ पिकांवरही परिणाम होण्याची शक्यता आहे.

तीन ते चार दिवस ढगाळ वातावरण२२ डिसेंबरपर्यंत तुरळक भागात ढगाळ वातवरण राहण्याची शक्यता नागपूरच्या प्रादेशिक हवामान केंद्राने वर्तविली आहे. त्यामुळे किमान तापमान १५.० अंशावर राहण्याची शक्यता आहे. १७ डिसेंबर रोजी किमान तापमान १६.० राहील. १८ ला ते २० डिसेंबरपर्यंत १५ अंश २१ ला १६.० अंश तर २२ डिसेंबर रोजी हेच किमान तापमान १७.० अंश राहण्याची शक्यता आहे.ढगाळ वातावरणामुळे तुरीवर शेंगा पोखरणाºया तर हरभरा पिकावर घाटेअळीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. शेतकºयांनी नियमित शेताचे सर्वेक्षण करावे. किडींचा प्रादुर्भाव आढळून आल्यास शिफारसीनुसार कीटकनाशक फवारणी करावी.- डॉ. मोहनराव खाकरे,ज्येष्ठ कृषी शास्त्रज्ञ, अकोला.

 

 

टॅग्स :agricultureशेतीAkolaअकोलाFarmerशेतकरी