अकोला: राज्य सहकारी बँकेचे संचालक मंडळ बरखास्त झाल्याने अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदावरून का काढण्यात येऊ नये, अशी विचारणा करणारी कारणे दाखवा नोटीस अमरावती विभागीय सहनिबंधक संगीता डोंगरे यांनी २९ जानेवारी रोजी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ. संतोषकुमार कोरपे यांना बजावल्याने सहकार क्षेत्रात खळबळ उडाली आहे. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६0 चे कलम ११0 अ अन्वये मुंबई येथील राज्य सहकारी बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करण्यात आले आहे. संचालक मंडळ निष्प्रभावी करण्यात आलेल्या राज्य सहकारी बँकेवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ. संतोषकुमार कोरपे राज्य सहकारी बँकेचे संचालक होते. राज्य सहकारी बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करण्यात आल्याने डॉ. कोरपे हे अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक म्हणून राहण्यास अपात्र ठरतात. त्यामुळे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदावरून का काढण्यात येऊ नये, अशी कारणे दाखवा नोटीस अमरावती विभागीय सहनिबंधक (सहकारी संस्था ) संगीता डोंगरे यांनी २९ जानेवारी रोजी अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ. संतोषकुमार कोरपे यांना बजावली आहे.
कोरपेंच्या बँक अध्यक्षपदावर संकटाचे ढग
By admin | Updated: February 2, 2016 02:00 IST