शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारनं अदानींना दिली १ रूपये प्रतिवर्ष दराने १ हजार एकर जमीन; विरोधकांचा हल्लाबोल, प्रकरण काय?
2
"काँग्रेसचे १५ खासदार विकले गेले, मुख्यमंत्री रेड्डींच्या आदेशामुळे भाजपच्या उमेदवाराला केले मतदान"; कोणत्या आमदाराने केला गौप्यस्फोट?
3
पैसे तयार ठेवा! कॅनरा रोबेको, हीरो मोटर्ससह या ६ कंपन्यांचे येणार IPO; सेबीकडून मिळाली मंजुरी, पाहा डिटेल्स
4
महाराष्ट्रात २ लाख रोजगार; ॲनिमेशन, गेमिंग धोरण जाहीर, ५० हजार कोटींची गुंतवणूक, ३,२६८ कोटींचा आराखडा
5
Electric Scooter: चार्जिंग सुरू असताना इलेक्ट्रिक स्कूटरला आग; नवरा- बायकोचा होरपळून मृत्यू!'
6
"नक्की कोण जिंकलं? आणि…’’, राज ठाकरेंचा व्यंगचित्रातून शाह पिता-पुत्रावर टीकेचा बाऊन्सर 
7
मोबिक्विकला ४८ तासांत ४० कोटींचा फटका! लाखो युजर्सच्या खात्यातून पैशांची चोरी
8
Vaishno Devi Yatra: भयंकर घटनेनंतर वैष्णो देवी यात्रेला पुन्हा सुरूवात; ३४ भाविकांचा झाला होता मृत्यू
9
केवळ ₹१ विकली जाणार होती अपोलो टायर्स; आज आहे टीम इंडियाची ओळख, कोण आहेत मालक, किती आहे संपत्ती?
10
Dashavatar: पाचव्या दिवशीही कोटींमध्ये कमाई, दिलीप प्रभावळकरांच्या सिनेमाने आत्तापर्यंत किती कमावले?
11
Janta Darshan: किडनी, हृदय रुग्णांना मोठा दिलासा; उपचाराचा खर्च उचलणार योगी सरकार!
12
शेअर बाजारात पुन्हा तेजी, सेन्सेक्स २०४ अंकांनी वधारला; Nifty २५,३०० च्या जवळ, 'हे' स्टॉक्स वधारले
13
नक्षलवादी संघटनांकडून केंद्र सरकारला शांततेचा प्रस्ताव; १ महिना सशस्त्र संघर्ष विरामाची मागणी
14
हेल्थ-लाईफ इन्शुरन्सवर सूट, ITC वर कठोर भूमिका; पाहा २२ सप्टेंबरपासून काय-काय बदलणार?
15
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
16
केवळ संशयामुळे लाेकांची झडती घेता येणार नाही, अपवादात्मक परिस्थितीत लेखी कारणे बंधनकारक : कोर्ट
17
सोशल मीडियावर ‘फोटो एडिट’ ॲपची धूम; सुरक्षित ठेवा तुमचे फोटो, फसवणूक वाढली
18
मुलाच्या वाढदिवसादिवशी पोहोचलं वडिलांचं शेवटचं गिफ्ट, कुटुंबीयांना झाले अश्रू अनावर
19
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार!
20
"इथं काम करणं आता कठीण..."; रस्त्यांवरील खड्डे अन् वाहतूक कोंडीमुळे बंगळुरूतील कंपनी शिफ्ट होणार

दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार सामाजिक शास्त्र विषयाच्या आलेखाचे गुण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2019 13:11 IST

सामाजिक शास्त्र २, भूगोल विषयाच्या आलेखाच्या प्रश्नांचे पैकीच्या पैकी गुण दिले जातील, असे आश्वासन दिले.

अकोला: इयत्ता दहावीच्या सामाजिक शास्त्र पेपर २ च्या प्रश्नपत्रिकेसोबत आलेख उत्तर पुरवणी देण्यात न आल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार होते; परंतु यासंदर्भात शिक्षक महासंघाचे शेखर भोयर यांनी शनिवारी शिक्षण मंडळाच्या विभागीय सचिवांची भेट घेऊन विद्यार्थ्यांना सामाजिक शास्त्र विषयाच्या आलेखाचे गुण देण्याची मागणी केली. त्यानुसार विभागीय सचिवांनी विद्यार्थ्यांना अन्याय करणार नसून, त्यांना सामाजिक शास्त्र २, भूगोल विषयाच्या आलेखाच्या प्रश्नांचे पैकीच्या पैकी गुण दिले जातील, असे आश्वासन दिले.इयत्ता दहावीची परीक्षा विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. गुणांच्या आधारे विद्यार्थी विविध शाखांना प्रवेश घेतात; परंतु दहावीच्या सामाजिक शास्त्र २ व भूगोल विषयाची परीक्षा २२ मार्च रोजी पार पडली. परीक्षेदरम्यान सामाजिक शास्त्र २, भूगोल प्रश्नपत्रिकेला आलेख पुरवणी (उत्तरपत्रिका) देणे आवश्यक होते. दरवर्षी या पेपर मध्ये आलेखावरील प्रश्न असतोच व आलेख उत्तरपत्रिकासुद्धा पुरविल्या जातात; परंतु यंदा शिक्षण मंडळाने आलेख उत्तरपत्रिका दिल्या नाहीत. भूगोलाच्या प्रश्नपत्रिकेमधील प्रश्न क्र. ६ (अ) हा सांख्यिकीय माहितीच्या आधारे आलेख काढण्याच्या पद्धतीचा होता; परंतु परीक्षेदरम्यान परीक्षा मंडळाकडून आलेखच प्राप्त न झाल्यामुळे ऐनवेळी हा प्रश्न कसा सोडवावा, अशी समस्या विद्यार्थ्यांसमोर निर्माण झाली. आलेख उत्तरपत्रिका न मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांनी हा प्रश्न तसाच सोडून दिला. त्यामुळे या प्रश्नाचे गुण मिळतील की नाही, असा संभ्रम विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाला होता. इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांच्या गुणांचे नुकसान होऊ नये, परीक्षा मंडळाच्या चुकीमुळे विद्यार्थ्यांना तो प्रश्न सोडविता आला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्या प्रश्नाचे गुणदान करण्याची मागणी शिक्षक महासंघाचे संस्थापक शेखर भोयर यांनी अमरावती विभागीय परीक्षा मंडळाच्या सचिवांसोबतच परीक्षा मंडळ सचिव, पुणे यांच्याकडे केली. विभागीय सचिवांनी विद्यार्थ्यांना आलेखाच्या प्रश्नाचे पैकीच्या पैकी गुण दिले जातील, असे आश्वासन दिले. त्यामुळे विद्यार्थ्यांचे कोणतेही शैक्षणिक नुकसान होणार नाही.

 

टॅग्स :AkolaअकोलाStudentविद्यार्थीEducationशिक्षण