दोन मद्यधुंद पोलिस शिपायांमध्ये हाणामारी; अकोला पोलिस वसाहतजवळील घटना

By नितिन गव्हाळे | Published: July 6, 2023 05:29 PM2023-07-06T17:29:45+5:302023-07-06T17:30:34+5:30

दोघांवरही गुन्हा दाखल

Clash between two drunken police constables; Incident near Akola Police Colony | दोन मद्यधुंद पोलिस शिपायांमध्ये हाणामारी; अकोला पोलिस वसाहतजवळील घटना

दोन मद्यधुंद पोलिस शिपायांमध्ये हाणामारी; अकोला पोलिस वसाहतजवळील घटना

googlenewsNext

अकोला : किरकोळ वादातून दोन पोलिस शिपायांमध्ये मद्यधुंद अवस्थेत चांगलीच हाणामारी झाल्याची घटना मंगळवारी रात्रीदरम्यान घडली. दोघांच्या हाणामारीची बुधवारी पोलिस वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली होती. या प्रकरणात खदान पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

खदान पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिस मुख्यालयात कार्यरत पोलिस शिपाई सागर पांडे आणि पोलिस नियंत्रण कक्षात कार्यरत दशरथ सोळंके यांच्यात पोलिस वसाहतजवळील रस्त्यावर मंगळवारी रात्री किरकोळ कारणातून वाद झाला. शाब्दिक बोलचाल वाढल्याने, दोघांमध्ये चांगली हाणामारी झाली. यावेळी दोघेही मद्यधुंद अवस्थेत असल्याचे सांगितले जात आहे. दोघांच्या वादात चाकूही चालल्याची चर्चा पोलिसांमध्ये आहे. या प्रकरणात दोघांविरुद्ध भादंवि कलम ३२४ नुसार गुन्हा दाखल केल्याची माहिती खदानचे ठाणेदार धनंजय सायरे यांनी दिली.

Web Title: Clash between two drunken police constables; Incident near Akola Police Colony

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.