शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

नगराध्यक्ष चषक हाफ मॅरेथॉन स्पर्धा : नाशिकचा सुरेश वाघ प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2018 00:54 IST

मूर्तिजापूर : मैत्री बहूद्देशीय संस्था मूर्तिजापूरद्वारे आयोजित नगराध्यक्ष चषक हाफ मॅरेथॉन स्पर्धा २0१८ मध्ये नाशिकच्या सुरेश हिरामन वाघ याने प्रथम क्रमांक पटकावला.  वाशिमचा प्रकाश नानासाहेब देशमुख याने दुसरा क्रमांक पटकावला, तर तृतीय क्रमांकाचे पारितोषिक  गणेश नंदाजी डोईफोडे (शिंदखेड राजा) व संतोष महादेव चव्हाण (पिंपळोद) यांना विभागून देण्यात आले.

ठळक मुद्देवाशिमच्या प्रकाश देशमुखला दुसरा क्रमांक

लोकमत न्यूज नेटवर्कमूर्तिजापूर : मैत्री बहूद्देशीय संस्था मूर्तिजापूरद्वारे आयोजित नगराध्यक्ष चषक हाफ मॅरेथॉन स्पर्धा २0१८ मध्ये नाशिकच्या सुरेश हिरामन वाघ याने प्रथम क्रमांक पटकावला.  वाशिमचा प्रकाश नानासाहेब देशमुख याने दुसरा क्रमांक पटकावला, तर तृतीय क्रमांकाचे पारितोषिक  गणेश नंदाजी डोईफोडे (शिंदखेड राजा) व संतोष महादेव चव्हाण (पिंपळोद) यांना विभागून देण्यात आले. खा. संजय धोत्रे यांनी हिरवी झेंडी दाखवून मॅरेथॉन स्पर्धेस सुरुवात केली. यावेळी आमदार हरीश पिंपळे, भाजप जिल्हा सरचिटणीस श्रीकृष्ण मोरखडे, नगराध्यक्ष मोनाली कमलाकर गावंडे, भाजयुमोचे प्रदेश सचिव गिरीष गोखले, नगरसेवक सचिन देशमुख, सरिता राहुल पाटील, राहुल पाटील, शिवसेना शहर प्रमुख विनायक गुल्हाणे, डॉ. शर्मा, निजामभाई इंजिनिअर, गुलाब दुबे, रावसाहेब कांबे, न. प. मुख्याधिकारी दादाराव डोलारकर, ठाणेदार प्रदीप देशमुख आदींची उपस्थिती होती.आई मंगल कार्यालयात बक्षीस वितरण कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी खा. संजय धोत्रे यांचा आ. हरीश पिंपळे तसेच मैत्री बहूद्देशीय संस्थेचे अध्यक्ष राहुल पाटील, कोषाध्यक्ष गौरव देशमुख यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला, तर खा. संजय धोत्रे व आ. हरीश पिंपळे यांच्या हस्ते सरिता पाटील, गिरीष गोखले, रोशन इंगळे यांचा सत्कार करण्यात आला. प्रसंगी खा. धोत्रे व आ. पिंपळे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी स्पर्धेत सहभागी होणारे ६६ वर्षीय मनोहर ताकतोडे यांचाही सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नवृत्ती खोकले यांनी, संचालन दिलीप देशमुख यांनी, तर आभार नगराध्यक्ष मोनाली गावंडे यांनी मानले.

विदर्भातील खेळाडू झाले सहभागी अकोला, अमरावती, वाशिम, नागपूर, नाशिक, बुलडाणा आदी जिल्ह्यातून स्पर्धकांनी सहभाग दर्शविला. दरम्यान, मूर्तिजापूर शहर पोलिसांनी चोख वाहतूक व्यवस्था सांभाळून स्पर्धा यशस्वी होण्यासाठी सहकार्य केले. स्पर्धेसाठी कमलाकर गावंडे, निजाम इंजिनिअर, सचिन देशमुख, राहुल पाटील, प्रवीण लोकरे, आनंद महाजन, संतोष खोलगडे, राजू सदार, प्रवीण गुल्हाने, गोपाल भटकर, सचिन चांडक, अशोक धंदुकिया, त्रिलोक पचारिया, महेंद्र टाक  यांनी सहयोग दिला, तर स्पर्धा यशस्वितेसाठी गौरव देशमुख, शैलेश करडे, श्रीकांत मेश्राम, रवींद्र थोरात, नवृत्ती खोकले,भूषण इंगळे, गणेश पाडेन, सचिन भारती, हेमंत मेहता, पवन शेरेकर, शुभम धर्माळे, कमलेश दज्जुका, आनंद बांगड, मंगेश जायले, सुभाष शेगावकर, राम खंडारे, गौरव बांगड, कमल कुर्मी, नितीन भटकर, भूषण परवडकर, क्षितिज देशमुख, सागर लोकरे आदींनी परिश्रम घेतले. 

टॅग्स :Akola cityअकोला शहरMarathonमॅरेथॉन