शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

हरित खत निर्मीतीसाठी नगर परिषदांचा पुढाकार; महापालिका माघारल्या 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2018 13:13 IST

हरित खत निर्मीतीसाठी नगर परिषदांनी पुढाकार घेतल्याचे चित्र असतानाच राज्यातील ‘ड’ वर्ग महापालिकांनी पाठ फिरवल्याची माहिती समोर आली आहे.

अकोला: शहरात निर्माण होणाºया ओल्या कचºयावर प्रक्रिया करून कंपोस्ट खत तयार करण्याचे राज्य शासनाचे महापालिका, नगर परिषदांना निर्देश आहेत. खताची विपणन व विक्री करण्यासाठी ‘हरित महा सिटी कंपोस्ट’ हा ब्रान्ड वापरण्यास मान्यता घेण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यासह निर्माण होणाºया खताची केंद्र शासनाच्या पोर्टलवर माहिती सादर करणे बंधनकारक आहे. हरित खत निर्मीतीसाठी नगर परिषदांनी पुढाकार घेतल्याचे चित्र असतानाच राज्यातील ‘ड’ वर्ग महापालिकांनी पाठ फिरवल्याची माहिती समोर आली आहे.महापालिका, नगर परिषद क्षेत्रात दररोज मोठ्या प्रमाणात ओला व सुका कचरा निर्माण होतो. त्यावर प्रक्रिया करून योग्यरित्या विल्हेवाट लावली जात नसल्यामुळे प्रदूषणासोबतच जलस्त्रोत दुषित होण्याची समस्या निर्माण झाली आहे. कचºयाचे समुळ उच्चाटन व्हावे या उद्देशातून शासनाने मनपा, नगर परिषदांचे मुल्यमापन करण्यासाठी नियमावली तयार केली. शहरातून निघणाºया घनकचºयाचे ७५टक्के विलगीकरण करण्यासाठी शासनाने स्वायत्त संस्थांना जून २०१८ पर्यंत मुदत दिली होती. ओल्या कचºयावर शास्त्रोक्त पध्दतीने प्रक्रिया करणे बंधनकारक होते. ओल्या कचºयामध्ये मिथेनायझेशन व बायो.कंपोस्टींग प्रक्रियेचा समावेश गरजेचा आहे. कचºयापासून तयार होणाºया कंपोस्ट खताचे विपणन व विक्री करण्यासाठी ‘हरित महा सिटी कंपोस्ट’ हा ब्रॅन्ड वापरणे आवश्यक असून तत्पूर्वी शासनाच्या प्रयोगशाळेत खतांची चाचणी अनिवार्य करण्यात आली. चाचणीत पात्र ठरलेल्या कंपोस्ट खताची विक्री करण्यासाठी ‘हरित महा सिटी कंपोस्ट’ हा ब्रॅन्ड वापरण्यास स्वच्छ महाराष्ट्र अभियान संचालनालयाकडे प्रस्ताव सादर करणे स्वायत्त संस्थांना भाग होते. राज्यातील २३९ नगर परिषदांपैकी नागपूर,अमरावती विभागातील नगर परिषदांनी हरित खत निर्मीतीचे काम सुरु केले आहे. त्यातुलनेत महापालिका क्षेत्रात अद्यापही घनकचºयाचे व्यवस्थापन होत नसल्याची माहिती समोर आली आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका