शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

शहर बस वाहतूक सेवा ठप्प; दुसऱ्या दिवशीही तोडगा नाहीच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2019 13:39 IST

अकोला : उत्पन्न कमी अन् खर्च जास्त होत असल्याच्या सबबीखाली शहर बस वाहतूक सेवा दुसºया दिवशीही ठप्प पडल्याचे दिसून ...

अकोला: उत्पन्न कमी अन् खर्च जास्त होत असल्याच्या सबबीखाली शहर बस वाहतूक सेवा दुसºया दिवशीही ठप्प पडल्याचे दिसून आले. महापालिका आयुक्त संजय कापडणीस दीर्घ रजेवर असल्यामुळे या विषयावर तोडगा काढण्यासाठी प्रशासनाच्यावतीने उपायुक्त विजयकुमार म्हसाळ किंवा उपायुक्त प्रमोद कापडे यांनी पुढाकार घेऊन बस वाहतूक सेवेच्या संचालकांसोबत चर्चा करणे अपेक्षित होते. यादरम्यान, सिटी बसने प्रवास करणाºया सर्वसामान्य अकोलेकरांना मनस्ताप सहन करावा लागत असून, आॅटो चालकांचे चांगलेच फावले असल्याचे चित्र समोर आले आहे.महापालिका प्रशासनाच्यावतीने अकोलेकरांच्या सुविधेसाठी जानेवारी २०१७ मध्ये शहर बस वाहतूक सेवा सुरू करण्यात आली. याकरिता श्रीकृपा ट्रॅव्हल्ससोबत ३५ सिटी बसचा करार करण्यात आला. त्यापैकी पहिल्या टप्प्यात पाच बस सुरू करण्यात आल्या. जानेवारी २०१८ मध्ये आणखी पंधरा बस शहरात दाखल झाल्या. आज रोजी २० पैकी १८ बस शहरवासीयांच्या सुविधेसाठी कार्यान्वित आहेत. यादरम्यान बस संचालकांना अपेक्षित उत्पन्न प्राप्त होत नसल्याची स्थिती निर्माण झाल्याचे बोलल्या जात आहे. मध्यंतरी दोन महिन्यांपूर्वी थकीत वेतनाच्या मागणीसाठी सिटी बसवरील वाहक-चालकांनी कामकाज बंद केले होते. त्यावेळी धावपळ करून वाहक-चालकांना वेतन देऊन बस सेवा सुरू करण्यात आली. आता पुन्हा एकदा उत्पन्नापेक्षा खर्च जास्त होत असल्यामुळे संचालकांनी ६ जूनपासून बस सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला. बस सेवा बंद झाल्यामुळे सर्वसामान्य अकोलेकरांमध्ये नाराजी पसरली आहे. यावर शुक्रवारी बस वाहतूक सेवेचे संचालक व मनपा प्रशासनाच्यावतीने ठोस तोडगा काढणे अपेक्षित होते. तसे न झाल्यामुळे ही बस सेवा कधी सुरू होईल, असा सवाल अकोलेकरांनी उपस्थित केला आहे.

प्रशासनाची गाडी घसरली!मनपा आयुक्त संजय कापडणीस रजेवर असताना उपायुक्त विजयकुमार म्हसाळ, उपायुक्त प्रमोद कापडे यांच्यासारख्या अनुभवी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या समस्येतून मार्ग काढणे अपेक्षित आहे. आयुक्त रजेवर जाताच प्रशासकीय कामकाजाची गाडी रुळावरून घसरल्याचे चित्र दिसून येत आहे. दोन्ही उपायुक्तांच्या कामकाजाची शैली पाहता त्यांना प्रशासकीय घडी सुधारण्यात कवडीचाही रस दिसत नसल्याचे बोलल्या जात आहे.शहर बस वाहतूक सेवेसाठी कंपनीच्या संचालकांना अपेक्षित असा करारनामा करून देण्यात आला. उत्पन्नवाढीसाठी प्रयत्न करणे ही त्यांच्या अखत्यारीतील बाब आहे. बस सेवा बंद करणे हा पर्याय होऊ शकत नाही. ही परिस्थिती कायम ठेवल्यास निविदा प्रक्रिया राबवावी लागेल.-विजय अग्रवाल, महापौर.उत्पन्न वाढ का होत नाही, यासंदर्भात प्रशासनाला पत्रव्यवहार करून अवगत केले आहे. त्यावर उपाययोजना होणे अपेक्षित होते. उत्पन्नापेक्षा खर्च जास्त असल्याची वस्तुस्थिती असल्याने नाइलाजाने सेवा थांबविण्याचा निर्णय घ्यावा लागला. यावर तोडगा काढण्याची अपेक्षा आहे.-राजेश माने, संचालक श्रीकृपा ट्रॅव्हल्स.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका