शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

‘सीआयटीएस’ प्रशिक्षित उमेदवार आंदोलनाच्या पवित्र्यात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2020 17:20 IST

कौशल्य विकास व उद्योजकता विभागाने अवलंबिलेल्या चुकीच्या धोरणामुळे हे उमेदवार आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत,

- सुनील काकडेलोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: देशभरात ४७ ठिकाणी प्रशिक्षण मिळत असलेल्या ‘सीआयटीएस’ अभ्यासक्रमात उत्तीर्ण झालेले राज्यातील पाच हजार विद्यार्थी ‘आयटीआय’मध्ये शिल्प निदेशक पदभरतीमधून डावलेले जात आहेत. कौशल्य विकास व उद्योजकता विभागाने अवलंबिलेल्या चुकीच्या धोरणामुळे हे उमेदवार आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत, अशी माहिती शिल्प निदेशक प्रशिक्षित संघाचे महाराष्ट्र अध्यक्ष राजेश वाघारे यांनी दिली.सद्य:स्थितीत राज्यातील शासकीय ‘आयटीआय’मध्ये ७९३२ पदे मंजूर आहेत. त्यातील ३९४० निदेशक सेवेत कार्यरत असून २६४६ पदे रिक्त आहेत. दरम्यान, कौशल्य विकास व उद्योजकता विभागाने १३ एप्रिल २०२० रोजी ७०० निदेशक पदभरतीसाठी अधिसूचना जारी केली. त्यात ‘सीआयटीएस’ अभ्यासक्रम उत्तीर्ण उमेदवारांमधूनच पदे भरण्यात यावी, अशी मागणी शिल्प निदेशक प्रशिक्षित संघामार्फत केली जात आहे. डीजीटी, दिल्लीचा संदर्भ व न्यायालयाच्या आदेशानुसार आयटीआय निदेशक पदासाठी सीआयटीएस प्रशिक्षण पूर्ण केले असणे अनिवार्य आहे; मात्र कौशल्य विकास व उद्योजकता विभागाने जाहीर केलेल्या ७०० निदेशक पदभरती सूचनेमध्ये सीआयटीएस उमेदवारास ‘प्राधान्य’, असा उल्लेख करून आदेशाचे उल्लंघन करण्यात आले. यामुळे सीआयटीएस प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या उमेदवारांवर पुन्हा एकवेळ अन्याय होणार असल्याची स्थिती निर्माण झाली आहे. काय आहे सीआयटीएस प्रशिक्षण?भारतात ४७ ठिकाणी सीआयटीएस अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण केंद्र आहेत. आयटीआय निदेशक पदासाठी अर्ज करताना सीआयटीएस प्रशिक्षण पूर्ण असणे अनिवार्य आहे. हे प्रशिक्षण एक वर्षे कालावधीचे असून ते डीजीटी, दिल्ली यांच्यामार्फत घेण्यात येते. महाराष्ट्रातील सीआयटीएस प्रशिक्षित उमेदवारांची संख्या सुमारे पाच हजार आहे. शिल्प निदेशक हे पद भरताना सीआयटीएस प्रशिक्षण पूर्ण केले असावे, असे डीजीटी (दिल्ली) आणि औरंगाबाद न्यायालयाने अनिवार्य केले आहे; मात्र कौशल्य विकास व उद्योजकता विभागाने २०१४ साली पदभरतीच्या जाहिरातीत अशा उमेदवारांना केवळ ‘प्राधान्य’ म्हणून उल्लेख केला होता. त्याविरोधात संघटनेने आवाज उठविल्यानंतर पदभरती रद्द झाली. आता पुन्हा १३ एप्रिल २०२० रोजी काढलेल्या जाहिरातीत असाच प्रकार झाला असून हा सीआयटीएस प्रशिक्षण पूर्ण करणाºया उमेदवारांवर एकप्रकारे मोठा अन्याय आहे. तो खपवून घेतला जाणार नाही.- राजेश वाघारेराज्याध्यक्ष, शिल्प निदेशक प्रशिक्षित संघ, महाराष्ट्र

टॅग्स :washimवाशिमagitationआंदोलन