शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
3
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अॅक्शन मोडवर, अॅडव्हायजरी जारी
4
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
5
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
6
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
7
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
8
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
9
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
10
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
11
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
12
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
13
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
14
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
15
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
16
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
17
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
18
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम
19
पाकिस्तानला करायचीय भारताची बरोबरी, या दिवशी लॉन्च करणार 'चंद्रयान'! असं असेल संपूर्ण मिशन
20
मुंबई लोकलमधून पडून आणखी एका तरुणाचा बळी; सात दिवसात तिघांचा मृत्यू

संचार बंदीच्या काळात नागरिकांनी घरातच राहावे - बच्चू कडू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 7:58 PM

Bachchu Kadu News : प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री बच्चू कडू यांनी बुधवारी येथे केले.

अकोला: कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य शासनाने १४ एप्रिलच्या रात्रीपासून पंधरा दिवस राज्यात संचारबंदी घोषित केली आहे. या संचार बंदी च्या काळात नागरिकांनी घरातच राहावे व प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री बच्चू कडू यांनी बुधवारी येथे केले.

जिल्हाधिकारी दालनात कोविड-१९ संदर्भात आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीला जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार, मनपा आयुक्त निमा अरोरा, जिल्हा पोलीस अधीक्षक जी श्रीधर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुरेश आसोले, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश अपार, तहसीलदार विजय लोखंडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

कोविड रुग्णांना कोणत्याही प्रकारच्या वैद्यकीय सेवेची अडचण निर्माण होणार नाही,याची काळजी जिल्हा व आरोग्य प्रशासनाने घ्यावी असे निर्देश कडू यांनी दिले. ऑक्सिजनची कमतरता पडू नये यासाठी हवेतून ऑक्सीजन घेण्याबाबतचा प्लांट लवकरच सुरू करण्यात येणार असून या प्रकल्पास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. जिल्ह्यातील रुग्णांना ऑक्सिजन, रेडमीसिविर इंजेक्शन तसेच बेड ची कमतरता पडणार नाही, याकडे सतत लक्ष द्यावे, असेही त्यांनी सांगितले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे ५० खाटांचे आयसीयु युनिट तयार करण्याबाबत सूचना यावेळी पालकमंत्र्यांनी दिल्या.

 

शिवभोजन व मोफत अन्नधान्याबाबत नियोजन करा

जिल्ह्यात कोणी उपाशी राहू नये यासाठी शासनामार्फत शिवभोजन थाली मोफत मिळणार आहे. अत्यंत गरीब व ज्यांना जेवणाची व्यवस्था नाही अशा गरजूंसाठी शिवभोजन थाली मोफत मिळणार आहे. यासाठी गरजुंची नोंद करावी, असे आवाहन त्यांनी केले. शिवभोजन थाली व प्राधान्य गटांना देण्यात येणारे मोफत अन्नधान्य याबाबत नियोजन करावे व याचा गैरवापर होणार नाही यासाठी दक्षता घ्यावी अशा सूचना बच्चू कडू यांनी दिल्या.

टॅग्स :Bacchu Kaduबच्चू कडूAkolaअकोला