कोरोनाला रोखण्यासाठी लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. याअंतर्गत बाभूळगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येत असलेल्या बेलुरा येथे लसीकरण मोहीम राबविण्यात आली. शिबिर आयोजित करण्यासाठी बेलुराल खुर्द येथील सरपंच धम्मपाल इंगळे, उपसरपंच नागेश साबे आणि सर्व ग्रामपंचायत सदस्य यांच्या प्रयत्न केले. शिबिरात गावातील ४५ वर्षांवरील वयोगटातील ग्रामस्थांना कोविड १९ची लस उपलब्ध करण्यात आली. सरपंच इंगळे यांनी नियोजन करून, स्थानिक जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिबिर आयोजित केले होते. ग्रामपंचायत प्रशासनाने पुढाकार घेऊन लोकांना लसीचे महत्त्व समजावून सांगितले. गावात लसीकरण शिबिरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. गावातील १०० लोकांनी या लसीचा लाभ घेतला. शिबिराच्या यशस्वितेसाठी सरपंच धम्मपाल इंगळे, उपसरपंच नागेश साबे, सर्व ग्रामपंचायत सदस्य, आरोग्य विभागाचे कर्मचारी डॉ.मेसरे, दीपाली कराळे, डॉ.पेंढाळकर आणि सचिव रितेश सवईशाम, तसेच तंटामुक्त समितीचे अध्यक्ष राजेंद्र देशमुख यांनी परिश्रम घेतले. (फोटो)
बेलुरा येथे लसीकरण शिबिरात नागरिकांचा प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:14 IST