शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य विम्यापेक्षा नागरिकांची कोरोना पॉलिसीला प्रसंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2020 10:46 IST

ठरावीक कोविड पॉलिसी काढण्याकडे लोकांचा कल वाढल्याचे एजंटांनी सांगितले.

अकोला : कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असल्याने नागरिकांचा नियमित आरोग्य विमा घेण्यापेक्षा कोविड पॉलिसी काढण्याकडे कल वाढला आहे. त्यामुळे साधारण आरोग्य विम्यापेक्षा कोविड पॉलिसीचे प्रमाण जवळपास ४० ते ४५ टक्क्यांनी वाढले असल्याची माहिती विमा क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिली; मात्र अशा विम्याचा लाभ प्रत्यक्ष रुग्णालयात घेण्याचे प्रमाण हे दोन टक्क्यांपेक्षाही कमी असल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे.खासगी रुग्णालयांमध्ये बेड उपलब्ध नसल्याचे कारण सांगून साधारण आरोग्य विम्याचा अर्थात मेडिक्लेमचा फायदा रुग्णांना होत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे ठरावीक कोविड पॉलिसी काढण्याकडे लोकांचा कल वाढल्याचे एजंटांनी सांगितले.कोविड पॉलिसी आॅनलाइन आणि एजंटामार्फत काढण्याचे प्रमाण वाढले आहे. सर्वसाधारण आरोग्य विमा योजनेपेक्षा कोविड विम्याचा हप्ता कमी असल्याने गेल्या महिनाभरात याचे प्रमाण जवळपास ४० ते ४५ टक्क्यांपर्यंत वाढले आहे. आॅनलाइन विमा काढणाऱ्यांचा विचार केला तर हे प्रमाण आणखी जास्त असू शकते. विमा लागू होऊन त्याचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना कमी वेळ मिळाल्याने प्रत्यक्ष रुग्णालयातील माहितीनुसार अशा कोविड विम्याचा लाभ घेण्याचे प्रमाण २ टक्के असल्याचे समजते. पुढील काही महिन्यात यात वाढ होण्याची शक्यता आहे. एजंटांनी सांगितले, कोविड विमा काढण्याकडे लोकांचा कल वाढत आहे. साडेनऊ महिन्यांसाठी ही पॉलिसी असून, हप्ता, वेटिंग काळ कमी असल्याने तो सहज घेता येतो. सध्या कोरोना काळात याची गरज वाढली आहे. सध्या सर्वसाधारण आरोग्य विम्यातच कोविडचा समावेश असलेल्या योजनेकडे ग्राहकांचा कल वाढला आहे. कोरोना महामारीमुळे यात वाढ होताना दिसत आहे. लोक आरोग्याबाबत अधिक सतर्क झाल्याचे चित्र आहे.

यामुळे वाढतोय कलकोविड विम्याचा हप्ता हा नियमित आरोग्य विम्याच्या तुलनेत २२ ते २५ टक्के इतकाच आहे.कोविड विमा मंजुरीसाठी प्रतीक्षा काळ १५ दिवसांचा आहे. अन्य आरोग्य विम्यात तो ३० दिवसांचा असतो.कोविड विमा हा कॅशलेस नसला तरी त्याचा परतावा लगेच मिळतो.हा विमा काढताना कुठल्याही तपासणीचे बंधन नाही.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य