शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

अकोल्यात ख्रिस्ती धर्मियांचा 'पाल्म संडे' हर्षोल्हासात साजरा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2019 13:29 IST

अकोला: शहरासह अकोला जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये रविवार, १४ एप्रिल रोजी खिश्चन धर्मियांनी पाल्म संडे अर्थात वल्हांडणाचा पवित्र सण मोठ्या हर्षोल्हासात साजरा केला.

अकोला: शहरासह अकोला जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये रविवार, १४ एप्रिल रोजी खिश्चन धर्मियांनी पाल्म संडे अर्थात वल्हांडणाचा पवित्र सण मोठ्या हर्षोल्हासात साजरा केला. या सणाला झावळयाचा रविवार असेही म्हणतात. शहरातील दहा प्रार्थनास्थळांमध्ये (चर्च) यावेळी प्रार्थनासभांचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान, प्रभू येशू खिस्तांच्या वधस्तंभावरील दु:खसहनाची आठवण म्हणून येत्या शुक्रवारी संपूर्ण जगभर गुड फ्रायडे अर्थात उत्तम शुक्रवार हा सण साजरा करण्यात येईल, त्यानंतरच्या रविवारी प्रभू येशूंच्या पुनरुत्थानानिमित्त खिश्चन धर्मीय ईस्टर संडे हा सण साजरा करणार आहेत. 

प्रभू येशू खिस्तांनी अखिल मानवजातीच्या पापक्षालनासाठी क्रूसखांबावर दिलेल्या बलिदानाची आठवण म्हणून जगभरात गुड फ्रायडे (उत्तम शुक्रवार) हा सण साजरा केला जातो. तत्पूर्वी येशूंचे यरूशलेम नगरीत आगमन झाल्यानिमित्त रविवारी पाल्म संडे (झावळयाचा रविवार) साजरा करण्यात येतो. अकोल्यातही रविवारी हा सण मोठ्या हर्षोल्हासात साजरा करण्यात आला. यावेळी शहर आणि जिल्ह्यातील सुमारे ३० चर्चेसमधून प्रार्थनासभांचे सकाळी आयोजन करण्यात आले. खदान खिश्चन कॉलनी येथील बेथेल सेव्हिअर्स अलायन्स चर्चमध्ये रविवारी सकाळी ९ वाजता आयोजित प्रार्थनासभेमध्ये, पास्टर निलेश अघमकर यांनी पविञ बायबलमधील वचनांचा आधार घेत, पाल्म संडेचे महत्व विशद केले. तत्पूर्वी जस्टीन मेश्रामकर, पास्टर अघमकर यांच्या नेतृत्वात सकाळी ख्रिश्चन कॉलनीमधून दिंडी काढण्यात आली. यावेळी होसान्ना, प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादित असो अशा घोषणा देण्यात आल्या. यामध्ये संडेस्कूल, महिला संघ, तरुण संघाचे सदस्य सहभागी झाले होते. 

सध्या खिश्चन धर्मियांचा पवित्र लेन्थ महिना सुरु आहे. या चाळीस दिवसांच्या काळात खिश्चन बंधू-भगिनी उपवास आणि प्रार्थना करतात. घरोघरी कॉटेज प्रेअर्सचे आयोजन केले जाते. मौंदी गुरुवारनिमित्त प्रार्थनासभा होते. गुडफ्रायडेच्या दिवशी उपवासांची सांगता होते. येत्या शुक्रवारी १९ एप्रिल रोजी विविध चर्चेसमधून गुड फ्रायडेचा सण साजरा केला जाईल. त्यानंतर रविवार, २१ एप्रिल रोजी  प्रभू येशू खिस्तांच्या पुनरुत्थानानिमित्त जगभरात ईस्टर संडे हा सण साजरा करण्यात येणार आहे. त्यासाठी बेथेल सेव्हिअर्स चर्चच्या प्रांगणात शनिवारी रात्रीच एक मोठे रिंगण तयार करण्यात येते. रविवारी पहाटे सहा वाजता अकोल्यातील सर्वच चर्चचे सदस्य तेथे उपस्थित होऊन प्रात:कालच्या प्रार्थनासभेत सहभागी होतात. त्यानंतर इंग्रजांच्या काळापासून अस्तित्वात असलेल्या अकोल्यातील एकमेव खिश्चन कॉलनीमधून सकाळी साडेआठ वाजता दिंडी काढण्यात येऊन ईस्टर संडेनिमित्त विविध गीते गायली जातात. त्यानंतर चर्चमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. 

टॅग्स :AkolaअकोलाIndian Festivalsभारतीय सण