शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

ख्रिस्ती बांधवांना नाताळचे वेध : प्रार्थनास्थळ, घरांवर रोषणाई;  बाजारपेठ सजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2019 16:03 IST

नाताळासाठी अकोल्याची बाजारपेठ सजली असून, १६० वर्षांंचा इतिहास असणारी अकोल्यातील खिश्चन कॉलनीदेखील आकाशदिवे, कंदील, रंगीबेरंगी विद्युुत रोषणाईने उजळून निघाली आहे.

अकोला: ख्रिस्ती धर्मियांच्या पवित्र नाताळ सण अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला असताना शहरातील विविध चर्च तसेच ख्रिस्ती बांधवांच्या घरांवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. नाताळासाठी अकोल्याची बाजारपेठ सजली असून, १६० वर्षांंचा इतिहास असणारी अकोल्यातील खिश्चन कॉलनीदेखील आकाशदिवे, कंदील, रंगीबेरंगी विद्युुत रोषणाईने उजळून निघाली आहे.प्रभू येशूंचा जन्मदिवस असलेला ख्रिसमस अर्थात नाताळ हा सण मंगळवार, २५ डिसेंबर रोजी साजरा होत आहे. या सणाच्या निमित्ताने सजवले जाणारे ख्रिसमस ट्री, सांताक्लॉजचे कपडे, गिफ्ट याचे लहानांसोबतच मोठ्यांनाही आकर्षण असते. अजूनही पालक लहान मुलांच्या उशाला त्यांचे आवडते गिप्ट ठेवतात आणि सांताक्लॉजच्या आठवणीत लहान मुले रंगून जातात. नाताळ आता दोन दिवसांवर आल्याने ख्रिस्ती बांधवांच्या घराघरात सणाच्या स्वागताची जय्यत तयारी सुरु आहे. शहरातील सर्व चर्चेसना आणि घरांना रंगरंगोटी व आकर्षक विद्युुत रोषणाई करण्यात आली आहे. शहरातील गांधीरोडवरील बाजारपेठेत लहान मोठ्या आकाराचे ख्रिसमस ट्री, जिंगलबेल्स, चांदण्या, सांताक्लॉॅजचे शर्ट, शुभेच्छापत्रे, सांताक्लॉज टोपी, कपडे, चॉकलेटस, केकस, कॅडबरी, सजावटीचे साहित्य, रंगीबेरंगी मेणबत्या आणि डिझायनर जिंगल बेल्स दाखल झाल्या असून, त्यांच्या खरेदीसाठी ख्रिस्ती बांधवांची झुंबड उडाली असल्याचे दिसून येते.ख्रिश्चन कॉलनीत झगमगाटगेल्या आठवड्यापासूनच ख्रिस्ती बांधवांनी नाताळची तयारी सुरू केली. ख्रिश्चन कॉलनीतील घरांना आणि चर्चेसना रंगरंगोटी करण्यात आली. त्यामुळे ख्रिश्चन कॉलनी सध्या प्रकाशाने उजळून निघाली आहे. या सणानिमित्त अकोल्यातील प्रमुख आठ चर्चेस आणि जिल्हाभरातील मिळून सर्व सुमारे ३० चर्चेसमधून या सणाची तयारी झाली असून, येत्या दोन जानेवारीपर्यंत विविध धार्मिक आणि सांस्कतिक कार्यक्रमांचेदेखील आयोजन करण्यात आले आहे.मंगळवारी कॅरोल पार्टीमंगळवार, २४ डिसेंबरला रात्री या सर्व चर्चेसमधून कॅरोल पाटीर्चे आयोजन करण्यात आले असून, यामध्ये सहभागी होऊन शेकडो अबालवद्ध घरोघरी जाऊन ख्रिस्तजन्माची गीते सादर करतील.  बुधवार २५ डिसेंबरला सर्व चर्चेसमधून सकाळी ख्रिसमसनिमित्त प्रार्थनासभा होतील. त्यानंतर आठवडाभर विविध कार्यक्रमांची रेलचेल राहील. त्याचदिवशी सायंकाळी अकोल्यातून ख्रिसमसनिमित्त भव्य रॅली आयोजित करण्यात आली आहे. पुन्हा ३१ डिसेंबरला रात्री कॅरोल पार्टीद्वारे घरोघरी जाऊन नवीन वर्षाच्या स्वागताची गीते सादर केली जातील. अशाप्रकारे येत्या २ जानेवारीपर्यंत ख्रिश्चन धर्मीय नाताळ आणि नववषार्चा आनंद साजरा करतील.

 

टॅग्स :AkolaअकोलाChristmasनाताळIndian Festivalsभारतीय सण