शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी वेन्स यांची भेट, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
2
"जो हाल तेरे बाप का हुआ, वही तेरा होगा...!"; झिशान सिद्दीकी यांना जिवे मारण्याची धमकी 
3
पंतप्रधान मोदींनी दिलं खास गिफ्ट, खुश झाली अमेरिकन उपाध्यक्षांची मुलं! बघा VIDEO
4
"राज ठाकरे यांना झुकवून युती होऊ शकते, असे मला वाटत नाही, कारण..."; उदय सामंत स्पष्टच बोलले 
5
सरपंच संतोष देशमुख यांचे नाव देऊन शाळेत पुतळाही उभारणार; शिक्षण संस्थेचा मोठा निर्णय
6
काँग्रेसविरोधात भाजयुमोचे आंदोलन, संवेदनशील भागात तणाव
7
'यंदा कर्तव्य आहे' वाटतं? टॉस वेळी शुबमन गिलला बाउन्सर; हँडसम क्रिकेटरनं असा दिला रिप्लाय (VIDEO)
8
"राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती झाल्यास हत्तीवरून पेढे वाटणार"; ठाकरे गटाच्या नेत्याचा निर्धार
9
GT चा 'ब्लॉकबस्टर शो' जारी; घरच्या मैदानावर खेळणाऱ्या गत चॅम्पियन KKR वर पडले भारी!
10
भाजपला कधी मिळणार नवीन अध्यक्ष? RSS आणि पक्षाच्या उच्च नेतृत्वात विचारमंथन सुरू...
11
40 वर्षांचे प्रेम अन् 80 व्या वर्षी बांधली लगीनगाठ; अनोख्या लग्नाची सर्वत्र चर्चा...
12
IPL 2025 KKR vs GT : रिंकूनं घेतला जबरदस्त कॅच! शुबमन गिलचं शतक हुकलं (VIDEO)
13
"यात मनी लाँडरिंगचा गुन्हा कुठे आहे?"; सोनिया- राहुल गांधींवरील कारवाईवरुन पी. चिदम्बरम यांचा सवाल
14
पत्नीने का उचलले टोकाचे पाऊल? पाहा माजी डीजीपींच्या हत्येची Inside Story...
15
लॉकडाऊन एक फालतू निर्णय होता; व्हाईट हाऊसने कोरोनाची वेबसाईट बदलली, ट्रम्प अन् लॅब लीक...
16
टॅरिफनंतर ट्रम्प यांचा नवा आदेश, ८ मुद्द्यांची 'नॉन-टॅरिफ फ्रॉड' यादी जाहीर
17
राजस्थानचं टेन्शन वाढलं, संजू सॅमसनला दुखापत, आरसीबीविरुद्ध खेळणार नाही!
18
खरी ठरली नॅस्ट्रोडॅमसची भविष्यवाणी? काही शतकांपूर्वी व्हॅटिकन सिटी अन् पोप संदर्भात केलं होतं असं भाकीत
19
'कामाचं बोला' म्हणणाऱ्या एकनाथ शिंदेंना राजू पाटलांनी डिवचलं; पाठवली रखडलेल्या कामांची यादी
20
कौतुकास्पद! रोज फक्त १२० रुपये खर्च करुन कोट्यवधींची बचत; एक, दोन नव्हे तर घेतली ३ घरं

शिकस्त अंगणवाड्यांमध्ये बालकांची किलबिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2019 13:25 IST

अकोला : बालकांना आरोग्य सुविधा, पोषण आहार पुरवठा करण्यासोबतच शैक्षणिक गोडी लावण्यासाठी सुरू झालेल्या ग्रामीण भागातील अंगणवाडीच्या ४३० पेक्षाही अधिक इमारती शिकस्त झाल्या आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : बालकांना आरोग्य सुविधा, पोषण आहार पुरवठा करण्यासोबतच शैक्षणिक गोडी लावण्यासाठी सुरू झालेल्या ग्रामीण भागातील अंगणवाडीच्या ४३० पेक्षाही अधिक इमारती शिकस्त झाल्या आहेत. त्या शिकस्त इमारतींमध्येच सहा वर्षे वयोगटातील बालकांचा किलबिलाट सुरू आहे. शिकस्त इमारती पाडून तेथे नवीन निर्मिती तसेच काही ठिकाणी दुरुस्तीचे प्रसाव प्राप्त होण्याला जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडून विलंब सुरू असल्याचा प्रकार घडत आहे. जूनपासून आतापर्यंत २१४ इमारतींचे प्रस्तावच प्राप्त झाल्याची माहिती आहे.जिल्हा नियोजन समितीकडून गावांमध्ये अंगणवाडी बांधकामासाठी निधी दिला जातो. अंगणवाडीचे बांधकाम ग्रामपंचायतींऐवजी आता बांधकाम विभागाकडून केले जाते. त्यासाठी जिल्ह्यात नवीन २७ आणि दुरुस्तीसाठी ४०३ अंगणवाड्या निश्चित केल्या आहेत. त्या अंगणवाडींसाठी ६ कोटी १५ लाख रुपये निधी नियोजन समितीकडून मिळत आहे. हा निधी खर्च करून बालकांची शिकस्त इमारतीमधून सुटका तातडीने करणे आवश्यक आहे; मात्र बांधकाम विभागाकडून ठराविक रकमेची अंदाजपत्रके प्राप्त होण्यास विलंब होत आहे. महिला व बालकल्याण विभागाने ४३० अंगणवाड्यांची यादी त्या विभागाकडे दिली. त्यापैकी २१४ अंदाजपत्रके प्राप्त झाली. उर्वरित ५० टक्के अंदाजपत्रकांची प्रतीक्षा करावी लागत आहे, तसेच शिकस्त इमारतींमधील बालकांचा जीवही धोक्यात आला आहे.अपूर्ण कामांसाठी फौजदारीचा विसरग्रामीण भागातील बालकांसाठी अंगणवाडी निर्मितीवर २०१०-११ ते २०११-१२ पासून कोट्यवधी रुपये खर्च झाल्यानंतरही शेकडो कामे अपूर्ण आहेत. त्या अपूर्ण कामांची तातडीने पडताळणी करून संबंधितांवर फौजदारी कारवाई करण्याचा आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी जिल्ह्यातील सर्वच गटविकास अधिकाऱ्यांना १८ जून रोजीच्या बैठकीत दिला होता. विशेष म्हणजे, या काळात ७४६ पेक्षाही अधिक अंगणवाड्यांसाठी १५ कोटीपेक्षा अधिक निधी ग्रामपंचायतींना देण्यात आला आहे. इमारत अपूर्ण असल्याची कारणे व जबाबदारी निश्चित करून संबंधितांवर तत्काळ फौजदारी कारवाईचाही आता विसर पडल्याची चिन्हे आहेत.

तालुकानिहाय अंगणवाडी निर्मिती, दुरुस्तीची कामेतालुका                 नवीन निर्मिती                     दुरुस्तीअकोला                        १०                                 ११६अकोट                          ०५                                   ७८मूर्तिजापूर                    ०४                                  ०९बाळापूर                       ०४                                  ५९बार्शीटाकळी                ०३                                   ७४तेल्हारा                       ०१                                   १७पातूर                           ००                                   ४९

टॅग्स :AkolaअकोलाEducation Sectorशिक्षण क्षेत्र