शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

तीन लाख रुपयांमध्ये पोटच्या मुलीला विकण्याचा प्रयत्न बालकल्याण समितीने हाणून पाडला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2019 12:17 IST

अकोला: पोटच्या मुलीला दत्तक द्यायचे सांगत, संबंधित दाम्पत्याला ३ लाख रुपयांची मागणी करून मुलीला विकण्याचा प्रयत्न बालकल्याण समितीने सोमवारी सायंकाळी हाणून पाडला.

अकोला: पोटच्या मुलीला दत्तक द्यायचे सांगत, संबंधित दाम्पत्याला ३ लाख रुपयांची मागणी करून मुलीला विकण्याचा प्रयत्न बालकल्याण समितीने सोमवारी सायंकाळी हाणून पाडला. या प्रकरणात बालकल्याण समितीच्या तक्रारीनुसार खदान पोलिसांनी तिघा मायलेकांविरुद्ध गुन्हा दाखल केला.बालकल्याण समितीच्या सदस्य अ‍ॅड. सुनीता कपिले यांच्या तक्रारीनुसार दिवाळीच्या दरम्यान न्यू भीम नगरात राहणारे सुनील राऊत व त्याची आई हे बालकल्याण समितीच्या अध्यक्ष पल्लवी कुळकर्णी यांच्याकडे गेले होते. या ठिकाणी त्यांनी आम्हाला दोन मुलींपैकी एक सहा महिन्याच्या चिमुकलीला दत्तक द्यायचे आहे. मुलींचा सांभाळ करण्यास आम्ही सक्षम नसल्याचे त्यांनी सांगितले. पल्लवी कुळकर्णी यांनी त्यांना दत्तक विधानासाठी कायदेशीर प्रक्रिया केल्यानंतर मुलगी दत्तक देता येईल, असे सांगितले; परंतु पल्लवी कुळकर्णी यांना संशय आल्याने त्यांनी बालसंरक्षण समितीसह पोलिसांची मदत घेतली. त्यासाठी बनावट दाम्पत्य उभे करण्यात आले आणि या दाम्पत्याला मूल दत्तक हवे असल्याचा बहाणा करण्यात आला. या दाम्पत्याकडे सुनील राऊत व त्याची आई गेल्यानंतर त्यांनी सहा महिन्यांची मुलगी देण्याची तयारी दर्शविली; परंतु त्यासाठी त्यांनी बनावट दाम्त्याला ३ लाख रुपयांची मागणी केली. या बनावट दाम्पत्याने पैसे देण्याची तयारी दर्शविली. या प्रकारामुळे सुनील राऊत व त्याच्या आईचा हेतू बालकल्याण समितीच्या लक्षात आल्यावर हा मुलगी विकण्याचा गंभीर प्रकार असल्याने, त्यांनी खदान पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी सुनील राऊत व त्याच्या आईविरुद्ध बालन्याय अधिनियम ८१ व कलम ५११ नुसार गुन्हा दाखल केला. बालकल्याण समितीच्या सतर्कतेमुळे पोटच्या मुलीला विकण्याचा व मुलगी नको म्हणून तिला दत्तक देण्याचा प्रकार उघडकीस आला. (प्रतिनिधी)नकोशी मुलीलाही दत्तक देण्याचा प्रयत्न!सुनील राऊत याचा मोठा भाऊ संतोष राऊत याला आणि त्याच्या पत्नीला मुलगा हवा होता; परंतु मुलगी झाल्यामुळे ती नकोशी झाली. या मुलीचे काय करायचे, म्हणून संतोष राऊत हासुद्धा बालकल्याण समितीच्या अध्यक्ष पल्लवी कुळकर्णी यांना भेटला आणि आम्हाला मुलगा हवा होता; परंतु मुलगी झाली. ही मुलगी आम्हाला नको. म्हणून तिला दत्तक द्यायची आहे, असे सांगितले. त्यामुळे पोलिसांनी त्याच्याही विरुद्ध गुन्हा दाखल केला.

दिवाळीपासून आरोपींना मुलीला दत्तक देण्याच्या नावाखाली विकायचे होते; परंतु आम्हाला संशय आल्याने, बालसंरक्षण अधिकारी करुण महंतरे, पोलीस विभागाच्या मदतीने आम्ही बनावट दाम्पत्य तयार केले. त्यांना आरोपी मुलगी दत्तक देण्यास तयार झाले; परंतु त्यासाठी आरोपीच्या आईने त्या दाम्पत्याला ३ लाख रुपयांची मागणी केली. तसेच आरोपीच्या भावाने मुलगी नको म्हणून तिला दत्तक देण्याचा प्रयत्न केला.- पल्लवी कुळकर्णी, अध्यक्षबालकल्याण समिती, अकोला

 

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारी