शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला शस्त्रास्त्रे देणाऱ्या तुर्कीवर पुण्यातून ट्रेड स्ट्राईक; उदयपूरचे संगमरवर व्यापारीही माल आणणार नाहीत
2
कोण आहे कशिश चौधरी?; वयाच्या २५ व्या वर्षी या हिंदू मुलीनं पाकिस्तानात रचला इतिहास
3
Stock Market Today: या वृत्तानं बदलला बाजाराचा मूड; १३० अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स, IT-Metal स्टॉक्समध्ये तेजी
4
मोठी बातमी! अकोल्यातील पाच सराफा दुकानांवर आयकरची धाड; सकाळपासून शोधमोहिम सुरू
5
भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानी एअरबेस उद्ध्वस्त; लढाऊ विमाने जळून राख, सॅटेलाईट फोटो पाहा
6
भारतीय वंशाच्या अनिता आनंद कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री; ट्रुडोंनी बिघडविलेले संबंध सुधारण्याची अपेक्षा
7
PPF बनवेल कोट्यधीश, कमाल आहे १५+५+५ ची जादू; बनेल १ कोटींचा बॅलन्स, पण कसा?
8
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
9
S-400: सिलिगुडी कॉरिडॉरला 'सुदर्शन चक्र' चे संरक्षण असणार; कोणत्याही धोक्याला तोंड देण्यासाठी सैन्य सज्ज
10
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
11
पाकविरोधात केंद्र सरकारच्या कारवाईवर जनता खुश आहे की नाही?; ऑपरेशन सिंदूरनंतर समोर आला सर्व्हे
12
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
13
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
14
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
15
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
16
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
17
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
18
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
19
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
20
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार

विकासकामे, प्रश्नांचा मुख्यमंत्री घेणार आढावा

By admin | Updated: December 9, 2014 00:37 IST

जिल्हाधिका-यांनी घेतली बैठक; माहिती सादर करण्याचे निर्देश.

अकोला: जिल्ह्यातील विविध प्रलंबित विकासकामे आणि प्रश्नांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आढावा घेणार आहेत. त्यासाठी आवश्यक असलेली माहिती सादर करण्याचे निर्देश प्रभारी जिल्हाधिकारी शिवाजी दिवेकर यांनी सोमवारी अधिकार्‍यांच्या बैठकीत दिले.राज्य विधिमंडळाच्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशन काळात चालू आठवड्याअखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अकोला जिल्ह्यातील विविध प्रलंबित विकासकामे आणि प्रश्नांबाबत आढावा बैठक घेणार आहेत. त्यामध्ये जिल्ह्यातील विविध विकास कामांसह प्रलंबित प्रश्नांचा समावेश आहे. याशिवाय जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती निवारणासाठी उपाययोजनांची माहितीदेखील मुख्यमंत्र्यांकडून घेतली जाणार आहे. त्यानुषंगाने प्रभारी जिल्हाधिकारी शिवाजी दिवेकर यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकार्‍यांची बैठक घेतली. मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकीत जिल्ह्यातील प्रलंबित विकासकामे आणि प्रश्नांबाबत सादरीकरण करण्यासाठी आवश्यक असलेली माहिती संबंधित विभागाने तातडीने सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकार्‍यांनी संबंधित अधिकार्‍यांना दिले. या बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी अनिल खंडागळे, उपजिल्हाधिकारी उदय राजपूत, मिलिंद शेगावकर, जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल टाकसाळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता एस.एस. भगत, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.एम.एच. तुपकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाचे उपसंचालक एम.डी. मालसुरे, जिल्हा परिषद लघुसिंचन विभागाचे उपअभियंता डी.एन. मडावी यांच्यासह भूजल सर्वेक्षण यंत्रणा व इतर विभागाचे अधिकारी उपस्थित होते.*पूर्णा नदीचे दूषित पाणी; कारवाई करण्याचे निर्देश!अमरावती येथील ह्यएमआयडीसीह्णमधील दूषित सांडपाण्यामुळे पूर्णा नदीचे पाणी दूषित झाले आहे. यासंदर्भात प्रदूषण नियंत्रण मंडळाने संबंधितांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी शिवाजी दिवेकर यांनी आढावा बैठकीत दिले.

*पाणीटंचाई निवारणाचा घेतला आढावा!जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणासाठी करावयाच्या उपाययोजनांच्या कामांचा आढावा जिल्हाधिकार्‍यांनी घेतला. येत्या मे, जून महिन्यात जिल्ह्यात चाराटंचाईची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असून, चाराटंचाई निवारणासाठी जिल्ह्यातील चारा दुसर्‍या जिल्ह्यात जाणार नाही, यासाठी जिल्ह्यात चाराबंदी करावी, तसेच जनावरांसाठी चारा डेपो उघडावे लागतील, अशी माहिती जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.एम.एस. तुपकर यांनी या बैठकीत दिली.