शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

तुषार पुंडकर हत्याकांडात दोषारोपपत्र दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2020 10:37 IST

४७५ पानांचा समावेश असलेले दोषारोपपत्र अकोट येथील सत्र न्यायालयात मंगळवारी दाखल केले.

अकोला : प्रहार जनशक्ती पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष तुषार पुंडकर यांच्या हत्याकांड प्रकरणाचा अकोट पोलीस तसेच स्थानिक गुन्हे शाखेने तपास केल्यानंतर ४७५ पानांचा समावेश असलेले दोषारोपपत्र अकोट येथील सत्र न्यायालयात मंगळवारी दाखल केले. या दोषारोपपत्रात सात आरोपींचा समावेश असून, ६ आरोपी कारागृहात आहेत, तर एक आरोपी अद्यापही फरार असल्याची माहिती आहे. स्थानिक गुन्हे शाखेने सदर आरोपीचा शोध सुरू केला आहे.अकोट शहर पोलीस ठाण्याला लागून असलेल्या पोलीस वसाहतमध्ये तुषार पुंडकर यांच्यावर २१ फेब्रुवारी रोजी दुचाकीवर आलेल्या दोघांनीही दोन्ही पिस्तूलमधून गोळ्या झाडल्याने त्यांचा मृत्यू झाला होता. तुषार पुंडकर यांच्या हत्येचा कट रचून त्यांची हत्या केल्याने पोलिसांना या प्रकरणात तपास करण्यासाठी प्रचंड मेहनत करावी लागली होती. या तपासादरम्यान स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख शैलेश सपकाळ व अकोटचे ठाणेदार संतोष महल्ले यांनी अकोट शहरातील रहिवासी पवन सेदानी, श्याम नाठे आणि अल्पेश दुधे या तीन आरोपींना २६ मार्च रोजी अटक केली. त्यानंतर निखिल सेदानी आणि गुंजन चिचोळे या दोन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली. या पाच आरोपींसह शाहबाज खान आणि शुभम जाट हे दोघेही आरोपी असल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणात एकूण सात आरोपी असल्याचे उघडकीस आल्यानंतर यामधील पवन सेदानी, श्याम नाठे, अल्पेश दुधे, निखिल सेदानी आणि गुंजन चिचोळे या पाच आरोपींना सुरुवातीलाच अटक करण्यात आली, तर शाहबाज खान हा दुसऱ्या एका प्रकरणात कारागृहात आहे आणि शुभम जाट हा अद्यापही फरार असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. राजकीय वलय असलेले हे हत्याकांड झाल्यानंतर विविध तर्कवितर्क लावण्यात येत होते; मात्र पोलीस अधीक्षक अमोघ गावकर यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा तसेच अकोट पोलिसांनी या प्रकरणात तपास करून तब्बल ४७५ पानांचे दोषारोपपत्र अकोट येथील सत्र न्यायालयात दाखल केले. यामध्ये सात आरोपींचा समावेश असून, पुढील सुनावणीस लवकरच प्रारंभ होणार असल्याची माहिती आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारी