अकोला रेल्वेस्थानकाचा बदलतोय चेहरा-मोहरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2018 02:51 PM2018-12-15T14:51:56+5:302018-12-15T14:52:10+5:30

अकोला : मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डी. के. शर्मा डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात अकोला दौऱ्यावर असल्याने अकोला रेल्वेस्थानकाचा चेहरा-मोहरा बदलला जात आहे.

 Changing face of Akola railway station | अकोला रेल्वेस्थानकाचा बदलतोय चेहरा-मोहरा

अकोला रेल्वेस्थानकाचा बदलतोय चेहरा-मोहरा

googlenewsNext


अकोला : मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डी. के. शर्मा डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात अकोला दौऱ्यावर असल्याने अकोला रेल्वेस्थानकाचा चेहरा-मोहरा बदलला जात आहे. रेल्वेस्थानकावरील सुविधेत कुठे काही कमतरता भासू नये म्हणून भुसावळ रेल्वे विभागाच्या व्यवस्थापकांची दौरे वाढली आहेत. याच कामाचा भाग म्हणून भुसावळ डीआरएम आर. के. यादव शनिवारी अकोल्यात दाखल होत आहेत.
रेल्वेस्थानकच्या प्रमुख इमारतीसमोरचा परिसर डांबरीकरणाने सुसज्ज केला जात आहे. सोबतच रेल्वेस्थानकावरील पार्किंगकडे रेल्वे प्रशासनाने विशेष लक्ष कें द्रित केले आहे. फोर व्हीलर पार्किंगसाठी ‘ड्रॉप अ‍ॅण्ड गो’ची सेवा सुरू होत आहे.
प्रत्येक तीन वर्षांनंतर मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक विभागीय रेल्वेस्थानकांचे निरीक्षण करीत असतात. याआधीचे महाव्यवस्थापक सुनीलकुमार सूद यांनी अकोल्याचे निरीक्षण केले होते. या घटनेला आता तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाला असल्याने या वर्षाच्या अखेरमध्ये शर्मा येत आहेत. या निरीक्षण कार्यक्रमामुळे अकोला रेल्वेस्थानक परिसराची रंगरंगोटी, प्लॅटफॉर्मवरील फरशांची डागडुजी, साफसफाई आणि सौंदर्यीकरणाचे काम वाढले आहे. त्यात डांबरीकरण, पार्किंग आणि सौंदर्यीकरणावर विशेष लक्ष दिले जात आहे.

‘ड्रॉप-पीक अ‍ॅण्ड गो’ची अंमलबजावणी
अकोला रेल्वेस्थानकाच्या मुख्य इमारतीसमोर फलक लावून ‘ड्रॉप-पीक अ‍ॅण्ड गो’च्या संकल्पनेला पूर्ण रूप देणे सुरू आहे. यासाठी वर्गीकरणानुसार लाइन आखल्या गेल्या असून, एक लाइन केवळ ‘व्हीआयपीं’साठी राखीव आहे. त्यानंतरच्या दुसºया लाइनचा वापर सर्वसामान्य अकोलेकरांना करता येईल. ज्यांना कार पार्किंग करायची असेल, त्यांना फलकाने दर्शविलेल्या ठिकाणी वाहन हलवावे लागतील.

 

 

Web Title:  Changing face of Akola railway station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.