शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

वातावरणात बदल: सर्दी, खोकला, तापाचे रुग्ण वाढले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2018 12:22 IST

अकोला : वातावरणात अचानक झालेले बदल, तापमानात झालेली घट व रात्री थंडी वाढल्याने गेल्या काही दिवसांत सर्दी, ताप-खोकला तसेच विषाणूजन्य तापाच्या रुग्णांमध्ये वाढ झालेली दिसून येत असून, सर्वोपचार रुग्णालयासह खासगी रुग्णालयांमध्येही रुग्णांची संख्या वाढली आहे.

अकोला : वातावरणात अचानक झालेले बदल, तापमानात झालेली घट व रात्री थंडी वाढल्याने गेल्या काही दिवसांत सर्दी, ताप-खोकला तसेच विषाणूजन्य तापाच्या रुग्णांमध्ये वाढ झालेली दिसून येत असून, सर्वोपचार रुग्णालयासह खासगी रुग्णालयांमध्येही रुग्णांची संख्या वाढली आहे.एकीएकडे सर्दी, कफ व खोकल्याने रुग्ण बेजार झाले आहेत. दुसरीकडे अनेक रुग्ण तापाने ग्रस्त आहेत. सर्वोपचार रुग्णालयात शेकडो रुग्ण तपासणीसाठी दाखल होत असल्याची माहिती येथील सूत्रांनी दिली आहे. प्रत्येक खासगी हॉस्पिटलमध्येसुद्धा या आजाराचे शेकडो रुग्ण आढळून येत आहेत. वेळेवर उपचार घेतला नाही, तर रुग्ण गंभीर होऊ शकतो. एकीकडे डेंग्यूचे रुग्ण आढळून येत आहेत. दुसरीकडे विषाणूजन्य तापाचेसुद्धा रुग्ण आढळून येत असल्याने ताप अंगावर काढू नका, असा सल्ला तज्ज्ञ डॉक्टरांनी दिला आहे. विशेष म्हणजे, ग्रामीण भागात थंडीचा जोर वाढला आहे. शिवाय, वैद्यकीय उपचार थातूरमातूर असल्याने परिस्थिती दाहक आहे.‘सर्वोपचार’मध्ये औषधांचा तुटवडावातावरणातील बदलाने सर्दी, खोकला व विषाणूजन्य आजाराचे प्रमाण वाढत असताना, गोरगरीब रुग्णांसाठी आधारवड असलेल्या येथील सर्वोपचार रुग्णालयात मात्र औषधांचा तुटवडा अजूनही कायमच आहे. अनेक रुग्णांना चिठ्ठी लिहून देऊन बाहेरून औषधे आणण्यास सांगितले जात आहे.अशी घ्यावी काळजी!ज्यांना या आजाराची लक्षणे आहेत, त्यांनी थंड हवेपासून दूर राहावे, थंड कोल्ड्रिंक्स व शीतपेय टाळावे, ताप असेल, तर पिण्याचे पाणी उकळून थंड करून प्यावे तसेच डॉक्टरांकडून योग्य औषधोपचार करणे गरजेचे आहे. सर्दी, खोकला व कफ असेल, तर कोमट पाण्यात मीठ टाकून गुळणी करणे आवश्यक ठरते.

 

टॅग्स :Akolaअकोलाhospitalहॉस्पिटल