शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

पंढरपूरात वारकऱ्यांच्या संरक्षणासाठी अकोल्याचे बचाव पथक चंद्रभागा नदीपात्रात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2018 17:06 IST

अकोला: आषाढी एकादशिनिमित्त पंढरपूर येथे जाणाºया वारकºयांच्या संरक्षणासाठी अकोला जिल्ह्यातील पिंजर येथील संत गाडगेबाबा आपत्कालिन शोध व बचाव पथकाचे सदस्य दरवर्षीप्रमाणे यावर्षीही चंद्रभागा नदीपात्रात सज्ज आहेत.

ठळक मुद्दे पथक प्रमुख दीपक सदाफळे यांच्या नेतृत्वात पथकाचे २७ जिवरक्षक जवान सज्ज आहेत. कुठल्याही स्वरुपाच्या आपत्तीचा सामाना करण्यासाठी पथकाचे सदस्य शोध व बचाव साहीत्यासह तयार आहेत. बचाव पथकाने गत तीन दिवसांत नदीपात्रात बुडत असलेल्या तीन वारकºयांचे प्राण वाचविले आहे.

अकोला: आषाढी एकादशिनिमित्त पंढरपूर येथे जाणाऱ्या वारकऱ्यांच्या संरक्षणासाठी अकोला जिल्ह्यातील पिंजर येथील संत गाडगेबाबा आपत्कालिन शोध व बचाव पथकाचे सदस्य दरवर्षीप्रमाणे यावर्षीही चंद्रभागा नदीपात्रात सज्ज आहेत. पथक प्रमुख दीपक सदाफळे यांच्या नेतृत्वात पथकाचे २७ जिवरक्षक जवान सज्ज आहेत. आषाढीवारी कालावधीत चंद्रभागा नंदीपात्रात दगडीपुल ते विष्णुपद घाट व वाळवंट परीसरात उद्भवणाऱ्या कुठल्याही स्वरुपाच्या आपत्तीचा सामाना करण्यासाठी पथकाचे सदस्य शोध व बचाव साहीत्यासह तयार आहेत. चंद्रभागा नदीपात्रात ‘रेस्क्यू बोट’ च्या सहाय्याने संपूर्ण नदीपात्रातील घाट आणी पुंडलीक महाराज मंदीर परीसरावर पथकाचे सदस्य नजर ठेऊन आहेत. विशेष म्हणजे, पुंडलीक महाराज मंदिर परीसरात पाण्यात बुडून वारकºयाचा मृत्यू झाल्याची एकही घटना घडली नसल्याचे सदाफळे यांनी सांगितले.तीन वारकऱ्यांना वाचविलेबचाव पथकाने गत तीन दिवसांत नदीपात्रात बुडत असलेल्या तीन वारकºयांचे प्राण वाचविले आहे. रविवारी चंद्रभागा नदी पात्रातुन दत्तघाटावरुन पुंडलिक महाराज मंदीराकडे पोहत येत असलेल्या सात भावीकांपैकी एकजण पात्राच्या मध्यभागी येऊन थकला. तेवढयात क्षणाचाही विलंब नकरता चौफाळयावर तैनात असलेल्या गाडगेबाबा आपत्कालीन पथकाच्या जवानांनी रेस्क्यू बोट त्या युवकाजवळ नेली आणी दोन जिवरक्षकांनी त्याला बोटमधे घेतले. यामुळे या भाविकाचे प्राण वाचले.याच पद्धतीने दुसऱ्या वारकरी भक्ताला म्हसोबा घाटाजवळुन वाचविले आहे. तीन दीवसापासुन एकुन तीन वारकरी भक्तांना वाचविण्यात यश आल्याचे पथक प्रमुख दीपक सदाफळे यांनी सांगितले.मंदिर समितीतर्फे पथकाचा होणार सत्कारसंत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाने गत चार वर्षांपासून केलेली कामगिरी पाहुन विठ्ठल रुक्मिणी मंदीर समीती, पंढरपूर यांनी पथक प्रमुख दीपक सदाफळे आणी सदस्यांचा येत्या २४ तारखेला सत्कार करण्याचे ठरविले आहे. मंदिर समितीचे अध्यक्ष मा.डॉ.अतुल भोसले व मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन ढोले यांनी ही माहिती दिल्याचे दीपक सदाफळे यांनी सांगितले.

 

टॅग्स :AkolaअकोलाPandharpurपंढरपूरAshadhi Ekadashiआषाढी एकादशी