अकोला : येत्या चार दिवस तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे. मागील चोवीस तासांत जिल्ह्यात सरासरी ६ मिलीमीटर पाऊस नोंदविल्या गेला. सर्वाधिक २४ मिलीमीटर पावसाची नोंद तेल्हारा तालुक्यात झाली. मागील चोवीस तासांत विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. कोकण गोव्यात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडल्याची नोंद हवामानशास्त्र विभागाने केली आहे. अकोला जिल्ह्यातही प्रदीर्घ खंडानंतर शनिारी पाऊस झाला. अकोला शहरात ११ मि.मी. पाऊस नोंदविल्या गेला. बाश्रीटाकळी येथे ४, आकोट तालुक्यात १ आणि मूर्तिजापूर तालुक्यात २ मि.मी. पाऊस नोंदविल्या गेला. बाळापूर आणि पातूर तालुक्यात नोंद घेण्याएवढाही पाऊस झाला नाही. या पावसाचा फायदा खरीपातील सोयाबीन, कापूस आणि तूर या पिकांना होणार आहे. दरम्यान, ३१ ऑगस्ट आणि १ ते ३ सप्टेंबरपर्यंत विदर्भासह राज्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान खात्यातर्फे वर्तविण्यात आली आहे.
तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता, तेल्हा-यात सर्वाधिक पाऊस
By admin | Updated: August 31, 2015 01:48 IST