शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
2
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
3
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
4
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
5
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
6
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
7
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
8
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
9
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
10
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
11
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
12
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
13
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
14
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
15
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
16
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
17
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
18
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
19
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
20
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार

सभागृह चालविण्याचे महापौरांसमोर आव्हान!

By admin | Updated: June 30, 2017 01:07 IST

विरोधकांसह स्वपक्षीयांचाही सामना : लागोपाठ दोन सभा गोंधळात

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : महानगरपालिकेच्या हद्दवाढीनंतर झालेल्या पहिल्याच निवडणुकीत भाजपाने बहुमताचाही आकडा पार करीत महापालिकेवर एकहाती सत्ता मिळविली. महापौर पदासाठी फार लॉबिंग न होता अनुभवी नगरसेवक विजय अग्रवाल यांच्या गळ्यात महापौर पदाची माळ पडली. स्थायी समिती सभापतीचीही निवड कुठलेही राजकारण न होता पार पडली. त्यामुळे आता महापालिकेचा कारभार सुरळीत चालेल, महासभेत चर्चा होऊन शहराच्या विकासाचा अजेंडा ठरेल, अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिकांनी बाळगणे चुकीचे नव्हते, प्रत्यक्षात मात्र महापालिकेच्या सभा या चर्चेचे व्यासपीठ होण्याऐवजी वादंगाचे आखाडे झाले आहेत. त्यामुळे सभागृहात विरोधकांचे समाधान करतानाच सत्ताधारी सदस्यांनाही शांत ठेवून सभागृह चालविण्याचे आव्हान महापौरांसमोर उभे ठाकले आहे.महापालिकेत भाजपाचे तब्बल ४८ सदस्य निवडून आले आहेत. आतापर्यंतच्या इतिहासात सत्ताधारी पक्षाकडे असे प्रबळ बहुमत नव्हते, एवढे बहुमत भाजपाला मिळाले आहे. तर दुसरीकडे विरोधकांची शक्ती कमी असून, राजकीय वादात ती विभागलेली आहे. अशा स्थितीत सभागृहावर भाजपाचे वर्चस्व असणे अपेक्षित आहे. प्रत्यक्षात मात्र विरोधक सत्ताधारी भाजपाला चांगलेच भारी पडत असल्याचे चित्र समोर आले आहे. २९ मे रोजी झालेल्या महासभेत करवाढीच्या मुद्यावरून शिवसेना व काँग्रेसने सभागृह डोक्यावर घेतले होते. मालमत्ता करामध्ये झालेली वाढ ही अवाजवी आहे, असा आरोप करून सेनेसह काँग्रेसच्या नगरसेवकांनी आधी चर्चा करा, अशी मागणी लावून धरली; मात्र ती फेटाळण्यात आल्याने सभागृहात खुर्च्यांची फेकाफेक, टेबलवर काच फोडण्याचा प्रकार, माईक तोडण्याची घटना, असा गोंधळ उडाला व अखेर पोलीस आणि सुरक्षा रक्षकांना पाचारण करावे लागले. मात्र, तरीही गोंधळ आटोक्यात येत नसल्याने महापौरांनी आक्रमक झालेल्या विरोधी पक्षनेते साजिद खान, शिवसेनेचे नगरसेवक राजेश मिश्रा, गजानन चव्हाण, मंगेश काळे या चारही नगरसेवकांना निलंबित करण्याची घोषणा केली. या महासभेनंतर बुधवारी झालेली महासभा ही गोंधळाला अपवाद ठरली नाही. यावेळी विरोधकांसह सत्ताधारी नगरसेवकही आक्रमक झाल्याने ‘गोंधळी’ वाढले व पुन्हा एकदा महासभेमध्ये विचारांऐवजी वादाचे रणकंदन झाले, याही वेळी माईक तुटलाच!या दोन्ही महासभांमधील गोंधळावरून महासभेपूर्वी भाजपा आपल्या नगरसेवकांचा वर्ग घेत नसल्याचे स्पष्ट होत आहे. नगरसेवकांना लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी लोकांनी निवडून दिले आहे. त्यामुळे जनतेच्या प्रश्नावर लक्ष वेधण्यासाठी सर्वच मार्गाचा अवलंब ते सभागृहात करतात, त्यात चुकीचे नाही; मात्र प्रत्येक वेळी लोटपोटपासून, तर तोडफोडपर्यंत प्रकार झाले तरच लक्ष वेधले जाते का? हा प्रश्नही आता लक्षात घेतला पाहिजे. महापौर हे अनुभवी आहेत, ‘जुगाड टेक्नालॉजी’मध्ये ते निष्णात असल्याने सर्वच राजकीय पक्षामध्ये त्यांची मैत्री आहे, असे असतानाही स्वपक्षीय नगरसेवकच विरोधाची भूमिका घेत असतील, तर आपल्या कार्यशैलीचे पुनरावलोकन करावे लागणार आहे. विशेष म्हणजे सत्ताधारी नगरसेवकांनी आंदोलनाचा आधी इशारा दिल्यावरही त्यांची दखल घेतली जात नसेल, तर भाजपामध्ये अंतर्गत मतभेद वाढण्यास वेळ लागणार नाही. करवाढीच्या मुद्यावर भारिप-बमसं, शिवसेना, काँग्रेस आधीच आक्रमक भूमिका घेत असून, आता त्यामध्ये दलितेतर आणि नगरोत्थानाच्या विकास निधी वाटपाच्या निकषांची भर पडली आहे. त्यामुळे विरोधकांसोबतच सत्ताधारी पक्षातील नगरसेवकांचाही विरोध भविष्यात वाढणार असल्याने भाजपाला सभागृह चालविण्याची नव्याने रणनीती आखावी लागणार आहे.काँग्रेसने आखली होती रणनीतीमहापालिकेत काँग्रेसची सदस्यसंख्या केवळ १३ आहे; मात्र या सर्व सदस्यांची बैठक विरोधी पक्षनेत साजीद खान यांनी महासभेच्या पूर्वसंध्येला घेऊन कोणत्या मुद्यावर सत्ताधारी पक्षाला घेरायचे याची रणनीती ठरली होती. विरोधी पक्षनेते म्हणून साजीद खान यांनी पहिल्याच सभेपासून घेतलेला आक्रमक पवित्रा कायम ठेवला असल्याने काँग्रेस पक्ष विरोधकांची भूमिका प्रभावीपणे पार पाडत आहे. विरोधी पक्ष नेत्याच्या दालनात झालेल्या या सभेला नगरसेवक इक्बाल सिद्दीकी, पराग कांबळे, डॉ.जिशान हुसेन, नौशाद आदींसह काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.