शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

 चार आंतरराष्ट्रीय शाळांच्या मुख्याध्यापकांना राज्यपालांकडून प्रमाणपत्र!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2019 12:05 IST

शाळांना आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाच्यावतीने अस्थायी संलग्नता प्रमाणपत्रांचे राज्यपाल विद्यासागर राव यांच्या हस्ते वितरण करण्यात आले.

अकोला: जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय शाळेतील चार मुख्याध्यापक व संबंधित गटशिक्षणाधिकारी यांचा राज्यपालांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन नुकताच गौरव करण्यात आला.जिल्हा परिषद अकोला अंतर्गत जि. प. शाळा वाडेगाव मुले पं.स. बाळापूर, जि. प. शाळा सिंदखेड पं.स. बार्शीटाकळी, जि. प. शाळा दिग्रस बु. पं.स. पातूर, जि. प. शाळा बोर्डी पं.स. अकोट या शाळांना आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाची संलग्नता प्राप्त झाली आहे. आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाच्यावतीने अस्थायी संलग्नता प्रमाणपत्र वितरण समारंभ सह्याद्री अतिथीगृह, मलबार हिल मुंबई, येथे नुकताच पार पडला. कार्यक्रमाला राज्यपाल विद्यासागर राव, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार, महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ पुणे संचालक सुनील मगर, महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ पुणे विश्वस्त विजय भटकर, प्राची साठे यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते. यंदा प्रथमच जिल्ह्यात चार शाळांना आंतरराष्ट्रीय शाळा म्हणून मान्यता मिळाली आहे. या शाळांना आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाच्यावतीने अस्थायी संलग्नता प्रमाणपत्रांचे राज्यपाल विद्यासागर राव यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. पातूरचे गटशिक्षणाधिकारी गौतम बडवे, बाळापूरचे गटशिक्षणाधिकारी समाधान जाधव, वाडेगाव येथील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक समाधान सोर, सिंदखेड येथील शाळेचे मुख्याध्यापक अरुण वानखडे, दिग्रस बु. येथील मुख्याध्यापक संजय बरडे, बोर्डी येथील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक उमेश चोरे उपस्थित होते. या सर्वांनी राज्यपाल विद्यासागर राव यांच्या हस्ते प्रमाणपत्र स्वीकारले. (प्रतिनिधी) 

 

टॅग्स :AkolaअकोलाSchoolशाळा