शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

आॅनलाइन अविरत प्रशिक्षित शिक्षकांना मिळणार प्रमाणपत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 13:49 IST

राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान आणि विद्या प्राधिकरणामार्फत निवडक शिक्षकांचे आॅनलाइन अविरत (सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास) प्रशिक्षण देण्यात आले होते. या शिक्षकांना आॅनलाइन प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यातून या प्रशिक्षणासाठी ९५० शिक्षकांनी नोंदणी केली होती.पैकी ९४४ शिक्षकांनी अविरत प्रशिक्षण पूर्ण केले. या प्रशिक्षित शिक्षकांना आता आॅनलाइन प्रमाणपत्र सुद्धा देण्यात येणार आहेत.

अकोला : शालेय विद्यार्थ्यांना शिकवताना, शिक्षकांनी विविध प्रयोग करावेत. हसतखेळत विद्यार्थ्यांना शिकवून कठीण वाटणारा विषय सोपा करून सांगता यावा, यासाठी राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान आणि विद्या प्राधिकरणामार्फत निवडक शिक्षकांचे आॅनलाइन अविरत (सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास) प्रशिक्षण देण्यात आले होते. जिल्ह्यातून ९४४ शिक्षकांनी प्रशिक्षण घेतले होते. या शिक्षकांना आॅनलाइन प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. त्यासाठी माहिती भरण्यासाठी शिक्षकांना ३१ आॅगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.जिल्हा परिषद, नगर परिषद शाळांमधील शिक्षणाचा दर्जा सुधारला पाहिजे. विद्यार्थी कॉन्व्हेंट संस्कृती सोडून पुन्हा जिल्हा परिषदेच्या शाळांकडे वळले पाहिजे. या दृष्टिकोनातून शिक्षकांना सक्षम करण्यासाठी राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान व विद्या प्राधिकरणामार्फत आॅनलाइन अविरत प्रशिक्षण घेण्यात येते. या प्रशिक्षणादरम्यान शिक्षकांकडून शालेय अभ्यासक्रमाशी संबंधित काही विषयाचे प्रश्न, काही प्रयोग देण्यात येतात. त्यांची सोडवणूक केल्यानंतर शिक्षक पुढील टप्पा गाठतात. जिल्ह्यातून या प्रशिक्षणासाठी ९५० शिक्षकांनी नोंदणी केली होती. पैकी ९४४ शिक्षकांनी अविरत प्रशिक्षण पूर्ण केले. या प्रशिक्षित शिक्षकांना आता आॅनलाइन प्रमाणपत्र सुद्धा देण्यात येणार आहेत. त्यासाठी शिक्षकांकडून देवनागरी लिपीत आॅनलाइन माहिती मागविली आहे. ही माहिती शिक्षकांना ३१ आॅगस्टपर्यंत संकेतस्थळावर भरण्यासाठी मुदत दिली आहे. (प्रतिनिधी)जिल्ह्यातील ९४४ शिक्षकांना अविरत अ‍ॅपच्या माध्यमातून प्रशिक्षण देण्यात आले. आता त्यांना प्रशिक्षण पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. त्यासाठी त्यांना आॅनलाइन माहिती सादर करायची आहे. त्यांनी माहिती भरली तरच प्रमाणपत्र मिळेल.- समाधान डुकरे, जिल्हा समन्वयक,सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास

 

टॅग्स :AkolaअकोलाEducationशिक्षणTeacherशिक्षक