शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीने पत्ते उघडले; शिक्षक मतदारसंघासाठी सुनिल तटकरेंनी केली उमेदवाराच्या नावाची घोषणा
2
रवींद्र धंगेकर यांचा भाजपवर आणखी एक गंभीर आरोप; ९९६ कोटींचा निधी घेतला आणि...
3
उत्तर कोरियाच्या हेरगिरी उपग्रहाचं प्रक्षेपण अपयशी, उड्डाण करताच काही सेकंदात उडाल्या रॉकेटच्या ठिकऱ्या
4
‘’हवे तेवढे पैसे घ्या, पण मला मारू नका’’, अपघातानंतर ‘बाळा’ने दाखवला पैशांचा माज, प्रत्यक्षदर्शीचा दावा  
5
राजकोट अग्नितांडव! गेम झोनच्या मालकाचाही जळून मृत्यू, आईच्या DNA मुळे पटली ओळख...
6
माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीच्या हत्येचे गूढ उकलले; जवळच्याच लोकांकडून दगाफटका, ३ आरोपींना अटक!
7
"युवासेनेच्या पदाधिकाऱ्याला कोस्टल रोडचे काम"; आदित्य ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर भाजपचे प्रत्युत्तर
8
आणखी एका फॅक्टरीमध्ये बॉयलरचा स्फोट, ४० कामगार होरपळले, ८ जणांची प्रकृती गंभीर
9
 प्रचारसभेवेळी राहुल गांधी झाले उकाड्याने त्रस्त, भरसभेत डोक्यावर ओतलं पाणी   
10
'कान्स'मधलं वातावरण भारावून टाकणारं होतं - छाया कदम
11
शालिमार-मुंबई एलटीटी एक्स्प्रेसमधील बंद एसीवरून प्रवाशांचा संताप
12
राज्यातील दुष्काळाच्या मुद्द्यावर काँग्रेस आक्रमक, परिस्थितीच्या पाहणीसाठी विभागवार समित्यांची स्थापना
13
कोस्टल रोडच्या टनेलला गळती, व्हिडिओ समोर येताच CM शिंदे 'इन अॅक्शन'; कायमस्वरुपीच्या दुरुस्तीचे आदेश!
14
WhatsApp युजर्सना खुशखबर! आता मोठे Voice मेसेज पाठवता येणार, जाणून घ्या कसे?
15
घरातून एकत्रच पळाल्या ३ मुली; पत्र वाचून कुणीही शोधण्याची हिंमत केली नाही, अखेर...
16
AAP नेत्या आतिशी यांच्याविरोधात कोर्टाने बजावले समन्स, केजरीवालही आहेत आरोपी, जाणून घ्या प्रकरण
17
ट्रेनमध्ये सीट बुक केली, तरीही उभे राहून करावा लागला प्रवास; रेल्वेला ठोठावला १३ हजारांचा दंड!
18
"यामिनी जाधवांकडून सापळेंवर कमिशनचे आरोप"; चौकशीचा ड्रामा कशासाठी म्हणत ठाकरे गटाची टीका
19
अमेरिकेतील संकट बनलं भारतासाठी संधी?; औषध उत्पादक कंपन्यांना मोठा फायदा
20
अमेरिकेत कारच्या धडकेत भारतीय विद्यार्थिनीचा मृत्यू; शिक्षण पूर्ण करुन नोकरीच्या होती शोधात

प्राथमिक शिक्षकांसाठी आता केंद्र शासनाची निष्ठा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 02, 2019 12:41 PM

या प्रशिक्षणामध्ये राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या, सर्व माध्यमाच्या शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील १00 टक्के शिक्षक व मुख्याध्यापक सहभागी होणार आहेत.

- नितीन गव्हाळे  लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: प्राथमिक शिक्षकांना विविध विषयांवर प्रशिक्षण देऊन शालेय गुणवत्ता वाढविण्याच्या दृष्टिकोनातून केंद्र शासनाच्या मानव संसाधन विकास मंत्रालयांतर्गत निष्ठा (नॅशनल इनिटिव्हिटिव्ह फॉर स्कूल हेड अ‍ॅण्ड टीचर्स होलिस्टिक अ‍ॅडव्हान्समेंट) राज्यस्तरीय प्रशिक्षण सुरू करण्यात येणार आहे. या प्रशिक्षणासंदर्भात शासनाने २५ नोव्हेंबर रोजी निर्देश दिले आहेत.राज्यातील इयत्ता पहिली ते आठवीचे शिक्षक, मुख्याध्यापक, डायटमधील अधिव्याख्याता, केंद्रप्रमुखासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्यावतीने ४ डिसेंबरपासून निष्ठा प्रशिक्षण घेण्यात येणार आहे. प्रशिक्षणादरम्यान अध्ययन निष्पत्ती, क्षमता आधारित अध्यापन व मूल्यांकन, विद्यार्थी केंद्रित अध्यापनशास्त्र, विद्यार्थी व शाळा सुरक्षितता, वैयक्तिक व सामाजिक गुणवैशिष्ट्ये, समावेशित शिक्षण, अध्ययन अध्यापनात माहिती व तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता यांचा वापर, आरोग्य या विषयांसोबतच ग्रंथालय, पर्यावरण क्लब, किचन गार्डन, युवा क्लब, शालेय नेतृत्व गुणवैशिष्ट्ये, पर्यावरणविषयक जाणीव जागृती, शाळापूर्व शिक्षण आदी विषयांवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. हे प्रशिक्षण दोन टप्प्यांत होणार आहे. पहिल्या टप्प्यात राज्यातील प्रत्येक तालुक्यातून पाच साधन व्यक्ती व एक राज्य साधन व्यक्तीची निवड करण्यात येणार आहे.दुसऱ्या टप्प्यात साधन व्यक्ती व राज्य साधन व्यक्ती हे तालुका स्तरावर शिक्षकांना प्रशिक्षण देणार आहेत. हा प्रशिक्षणाचा कार्यक्रम केंद्र शासनाच्या फ्लॅगशिपचा कार्यक्रम आहे. या प्रशिक्षणामध्ये राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या, सर्व माध्यमाच्या शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील १00 टक्के शिक्षक व मुख्याध्यापक सहभागी होणार आहेत.राज्यासोबतच अकोला जिल्ह्यातसुद्धा निष्ठा प्रशिक्षण राबविण्यात येणार आहे. या प्रशिक्षणामध्ये शिक्षक, मुख्याध्यापकांनी सहभागी व्हावे. निष्ठा प्रशिक्षण कार्यक्रमाचे नियोजन जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था (डायट) करणार आहे.-डॉ. समाधान डुकरे,प्राचार्य जिल्हा शैक्षणिकसातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था(डायट)

टॅग्स :AkolaअकोलाEducationशिक्षणTeacherशिक्षक