शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

सेल्युलर मोबाइल कॉल होताहेत अचानक ‘ड्रॉप’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2019 13:33 IST

अकोला : गत चार दिवसांपासून सेल्युलर मोबाइल कॉल अचानक ड्रॉप होत असल्यामुळे राज्यभरातील ग्राहक सध्या त्रस्त आहेत. याबाबत मोबाइल सेवा पुरविणाऱ्या कंपनीच्या कस्टमर केअर सेंटरला विचारणा केली असता, नाममात्र सर्व्हर डाउन असल्याचे सांगितले जातत्यातूनच अचानक कॉल ड्रॉप होण्याच्या घटना वाढल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे.

- संजय खांडेकर अकोला : गत चार दिवसांपासून सेल्युलर मोबाइल कॉल अचानक ड्रॉप होत असल्यामुळे राज्यभरातील ग्राहक सध्या त्रस्त आहेत. याबाबत मोबाइल सेवा पुरविणाऱ्या कंपनीच्या कस्टमर केअर सेंटरला विचारणा केली असता, नाममात्र सर्व्हर डाउन असल्याचे सांगितले जातत्यातूनच अचानक कॉल ड्रॉप होण्याच्या घटना वाढल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे.कधीकाळी मोबाइलवरील व्हॉइस कॉलिंगची सेवा ही केवळ रेडिओ फ्रीक्व्हेन्सीवर अवलंबून असायची. वायरलेसच्या या सेवेदरम्यान आॅप्टिकल्स फायबर केबलची सेवा सुरू झाली. या सेवेसोबतच जीओने इंटरनेट टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून डेटा कॉलिंगची नवीन पद्धत सेवेत आणली. अत्यंत स्वस्त दरात डेटा कॉलिंगची सेवा दिल्याने अनेक सेल्युलर मोबाइल कंपन्यांचे दिवाळे निघाले. जीओने या सेवेसोबत स्वत:चे स्वस्त उपकरणही ग्राहकांना उपलब्ध करून दिले. ग्राहक सेवेच्या या जीवघेण्या स्पर्धेत टिकण्यासाठी इतर कंपन्यांनीदेखील इंटरनेट टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून डेटा कॉलिंगची सेवा सुरू केली. जीओप्रमाणे स्वस्त दरात सेवा दिली गेली. मात्र अनेक नामांकित कंपन्यांना अजूनही नवीन तंत्रज्ञानाची सांगड जुळविता आलेली नाही. कधी कॉल लागत नाही, तर कधी कॉल ड्रॉप होतो. एकीकडे व्हॉट्स अ‍ॅप कॉलिंग होते, तर डेटा कॉलिंग बंद पडते. मध्येच आवाज तुटतो. वारंवार कॉल करूनही प्रतिसाद मिळत नाही. या समस्या गेल्या चार दिवसांपासून मोबाइल वापरणाºयांना भेडसावित आहेत. 

आॅप्टिकल फायबर केबलच्या दुरुस्तीचे काम सुरू असल्याने चार दिवसांपासून कनेक्टिव्हिटीच्या समस्या आहेत. बीएसएनएलची व्हॉइस कॉलिंग सेवा आणि इंटरनेट सेवा दोन्ही वेगवेगळ्या आहेत. डेटा कॉलिंग पद्धती आमच्याकडे नाही. चार दिवसांपासून ग्राहक त्रस्त आहेत, लवकर ही समस्या दूर होईल,-विजय पागृत, सहायक महाव्यवस्थापक, बीएसएनएलअकोला.  

 

टॅग्स :AkolaअकोलाMobileमोबाइलBSNLबीएसएनएल