शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

सीबीएसई दहावीच्या निकालाचा टक्का वाढला, प्रभात किड्सचा तन्मय हनवंत जिल्ह्यातून अव्वल, अद्धैत जोशी, भक्ती शर्मा द्वितीय

By नितिन गव्हाळे | Updated: May 13, 2024 22:55 IST

परीक्षेत प्रभात किड्स स्कूलचा तन्मय हनवंते याने ९९.२ टक्के गुण मिळवून जिल्ह्यातून अव्वल स्थान पटकावले आहे तर त्याचे सहकारी अव्दैत जोशी व भक्ती शर्मा यांनी ९९ टक्के गुणांसह व्दितीय क्रमांक पटकावला आहे.

अकोला: सीबीएसई दहावी परीक्षेचा निकाल सोमवार १३ मे रोजी जाहिर झाला असून, यंदाच्या सीबीएसई निकालामध्ये अकोला जिल्ह्याने चांगली भरारी घेतली असून, गतवर्षीच्या तुलनेत यंदाचा निकालाचा घवघवीत टक्का वाढल्याचे दिसून येत आहे. परीक्षेत प्रभात किड्स स्कूलचा तन्मय हनवंते याने ९९.२ टक्के गुण मिळवून जिल्ह्यातून अव्वल स्थान पटकावले आहे तर त्याचे सहकारी अव्दैत जोशी व भक्ती शर्मा यांनी ९९ टक्के गुणांसह व्दितीय क्रमांक पटकावला आहे.

‘प्रभात’च्या ९० विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळाले आहेत तर ६१ विद्यार्थ्यांना विविध विषयात १०० पैकी १०० गुण मिळाले आहेत. शाळेचा निकाल १०० टक्के लागला असून संस्कृत विषयात एकुण ४४ विद्यार्थ्यांनी १०० पैकी १०० गुण प्राप्त केले आहेत. वैभव अंबारखाने (९८.८), अर्थव निमकंडे (९८.४), सारा चौधरी (९८.२०), पार्थ राठोड (९८.२०), समृध्दी खांदेल (९८), पूनम पल्हाडे (९८), मयंक भोपाळे (९७.८), अर्णव कावरे (९७.८), आशी गोयनका (९७.८), केशव कोठारी (९७.६), दक्ष नेभनानी (९७.६०),यश राठोड (९७.६०), चाण्यक्य झापे (९७.४), जीत झांबड (९७), आर्या मानकर (९६.८), समीक्षा निचळ (९६.८), शांभवी टापरे (९६.८), साई उगले (९६.८), शशांक राऊत (९६.८), आर्या ढोले (९६.६), पूर्वा तितूर (९६.६), देवयानी जावळे (९६.४), र्धेर्य्या शर्मा (९६.४०), क्षीप्रा निलटकर (९६.२०), आयूष राठी (९६.२०), श्रेया वडतकर (९६.२०), श्रेयश पाटील (९६), श्रतुराज देशमुख (९६), श्रावणी लांडे (९५.६०), वल्लभ खेडकर (९५.६०), आर्या गावंडे (९५.४०), पृथा साठे (९५.४), पार्थ संघवी (९५), देवांशु काठकोरीया (९५), मनस्वी चतरकर (९५), शाश्वत रावणकर (९५), गार्गी भावसार (९५) आदी विद्यार्थ्यांनी घवघवीत यश प्राप्त केले आहे. याशिवाय १९० विद्यार्थ्यांना ७५ टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळाले आहेत. गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रभातचे संचालक डॉ.गजानन नारे, संचालिका वंदना नारे, प्राचार्या वृषाली वाघमारे, उपप्राचार्य अर्चना बेलसरे यांनी सत्कार केला.

पोदार इंटरनॅशनल स्कूलमधून सात्विक गावंडे, भक्ती मानधने प्रथमपोदार इंटरनॅशनल स्कूलचा सीबीएसई परीक्षेचा निकाल १०० टक्के लागला असून, सात्विक गावंडे, भक्ती मानधने या दोघांनी ९८. २ टक्के गुण मिळून प्रथम क्रमांक पटकाविला आहे. पलक शाह हिने ९७ टक्के मिळून द्वितीय तर इशिता गुज्जर, देवेश इंगोले यांनी ९६.६ टक्के गुण मिळून तृतीय क्रमांक पटकाविला आहे. तसेच ४५ विद्यार्थ्यांनी ९० टक्केहुन अधिक गुण मिळवले आहेत. ५५ विद्यार्थ्यांनी ८१ ते ९० टक्के गुण मिळवले आहेत. ध्रुव अग्रवाल आणि पलक शाह यांनी गणितात १०० पैकी १०० गुण मिळवले तर सात्विक गावंडे, भक्ती मानधने आणि सायली इंगळे यांनी सोशल सायन्स विषयात १०० पैकी १०० गुण मिळवले. शाळेचे इशिता गुजर-९६.६, देवेश इंगोले-९६.६, अनय राठी-९६.४, समायरा हेडा-९६.२, अमोघ अर्धपूरकर-९५.८, जान्हवी धारीवाल-९५.८ राधिका अभिजित बांगर-९५.६ ऋचा मित्तल-९५.२, ध्रुव अग्रवाल-९५.२ आदी घवघवीत यश प्राप्त केले आहे. गुणवंत विद्यार्थ्यांचा शाळेच्या प्राचार्या नीता तलरेजा यांनी सत्कार करून कौतुक केले. 

टॅग्स :SchoolशाळाStudentविद्यार्थीexamपरीक्षा