लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: गोहत्या बंदी कायदा असतानाही कत्तल करण्याच्या उद्देशाने गोवंशाची मोठ्या प्रमाणात शहरात वाहतूक होत आहे. रविवारी अकोट फैल पोलिसांनी कारमध्ये निर्दयीपणे गोऱ्ह्यास कोंबून कत्तल करण्यासाठी नेणाऱ्या आरोपीस अटक केली. कारमध्ये कोंबलेल्या गोऱ्ह्याचा गुदमरून मृत्यू झाला. याप्रकरणी अकोट फैल पोलिसांनी महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. अकोट फैल पोलिसांना कत्तलीसाठी गोऱ्हा घेऊन जात असल्याची मिळाली. पोलिसांनी अकोट रोडवर नाकाबंदी केली. दरम्यान, एमएच २९ व्ही. २८0५ क्रमांकाची काळ्या रंगाची कार तेथून जात असताना, पोलिसांनी ही कार अडविली. कारची तपासणी केली असता, कारच्या मागे एक गोऱ्हा मृतावस्थेत मिळून आला. पोलिसांनी कार व गोऱ्हा जप्त केला असून, कारचालक शेख शब्बीर शेख मलंग (रा. पूरपीडित कॉलनी) याला अटक केली. शेख शब्बीर हा गोऱ्हा कत्तलीसाठी नेत होता. ही कारवाई ठाणेदार तिरुपती राणे यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी केली. युवकाकडून विदेशी दारूच्या ४८ बाटल्या जप्तखदान पोलिसांनी सिंधी कॅम्प परिसरातून अवैधरित्या विदेशी दारूच्या बाटल्या घेऊन जाणाऱ्या युवकास अटक केली. त्याच्याकडून पोलिसांनी विदेशी दारूच्या ४८ बाटल्या जप्त केल्या. कापशी येथे राहणारा रामेश्वर काशीराम मानकर हा सिंधी कॅम्प परिसरातून मोटारसायकलवर विदेशी दारू नेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी छापा घालून रामेश्वर मानकर याला अटक केली. जप्त केलेल्या विदेशी दारूची किंमत ७ हजार २ रुपये आहे. ही कारवाई खदानचे ठाणेदार गजानन शेळके यांच्या मार्गदर्शनात तारासिंग राठोड, प्रदीप पवार, शरद बुंदे यांनी केली.
गोऱ्ह्यास कारमध्ये कोंबून नेणाऱ्यास अटक
By admin | Updated: May 15, 2017 01:57 IST