शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

राज्याबाहेरील जनावरांचा काफिला महाराष्ट्रात; दुष्काळात तेरावा महिना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 14:12 IST

 अकोट : राज्याबाहेरील जनावरांचा काफिला मोठ्या प्रमाणावर चराईकरिता महाराष्ट्रात  येत आहे. त्यामुळे येथील पाळीव जनावरे तसेच वन्य प्राण्यांनाही रोगराईची बाधा होण्याची शक्यता पाहता कडक निर्बंध घालण्यात आले आहेत.

ठळक मुद्दे गुजरात, मध्यप्रदेश, छत्तीसगड व राजस्थान आदी राज्यातून मोठ्या प्रमाणावर काठेवाडी व तत्सम दुग्धव्यावसायिकांची पाळीव जनावरे चराईकरिता येत आहेत. तोंडखुरी /पायखुरी व पशुमारीसारख्या रोगराईची बाधा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांकरिता दुष्काळात तेरावा महिना आला असल्याची गंभीर समस्या आत्महत्येस प्रवृत्त करणारी ठरत आहे.

- विजय शिंदे

 अकोट : राज्याबाहेरील जनावरांचा काफिला मोठ्या प्रमाणावर चराईकरिता महाराष्ट्रात  येत आहे. त्यामुळे येथील पाळीव जनावरे तसेच वन्य प्राण्यांनाही रोगराईची बाधा होण्याची शक्यता पाहता कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. शिवाय सद्यस्थितीत असलेल्या जनावरांची तपासणी करून त्यांना मूळ प्रदेशात जाण्याकरिता प्रवृत्त करावे अन्यथा कठोर कारवाई करण्याकरिता जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार देण्यात येत असल्याचे शासनाचे आदेश आहेत; परंतु महाराष्ट्रात  इतर राज्यातील जनावरांच्या कळपांनी बेकादेशीरपणे शिरकाव केला आहे. अशा परिस्थितीत शेतकºयांकरिता दुष्काळात तेरावा महिना ठरत असल्याची धक्कादायक परिस्थिती आहे.महाराष्ट्रात  गुजरात, मध्यप्रदेश, छत्तीसगड व राजस्थान आदी राज्यातून मोठ्या प्रमाणावर काठेवाडी व तत्सम दुग्धव्यावसायिकांची पाळीव जनावरे चराईकरिता येत आहेत. विशेष म्हणजे मध्यप्रदेश व गुजरातमधून प्रचलित प्रवेश मार्गाने येणाऱ्या जनावरांचे प्रमाण जास्त आहे. या जनावरांमुळे पाळीव जनावरे व अभयारण्याच्या क्षेत्रात असणाºया वन्य प्राण्यांमध्ये तोंडखुरी /पायखुरी व पशुमारीसारख्या रोगराईची बाधा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सद्यस्थितीत राज्यात परप्रांतामधून मोठ्या प्रमाणात जनावरे येत असल्याचे राज्य महामार्गासह इतर मार्गावर आढळून येत आहेत. शेतातील हंगामाची उलंगवाडी झाल्याने शेते चराईकरिता ही जनावरे आली आहेत. यावरून राज्यात प्रवेशावेळी कोणी कायदेशीर अटकाव केल्याचे दिसून येत नाही. सातपुड्याच्या पायथ्याशी जनावरे आढळून येत आहेत. त्यामुळे बेकायदेशीरपणे प्रवेश करण्यामागे जबाबदारी असलेल्या संबंधिताची मिलीभगत असल्याची शंका व्यक्त होत आहे. सध्या महाराष्ट्रात विशेषत: विदर्भात दुष्काळी परिस्थिती आहे. जनावरांना मुबलक चारा नसल्याने शेतकरी जनावरे विकत आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनीसुद्धा परराज्यात चारा पाठविण्यावर बंदी घातली आहे. अशा परिस्थितीत शासन आदेशाची पूर्तता होत नसल्याने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांकरिता दुष्काळात तेरावा महिना आला असल्याची गंभीर समस्या आत्महत्येस प्रवृत्त करणारी ठरत आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाakotअकोटMelghatमेळघाट