शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट प्रसारित करणाऱ्या ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2020 18:12 IST

११ जणांविरुद्ध विविध कलमांनुसार शनिवारी गुन्हा दाखल करून दोघांना अटक करण्यात आली.

पारस : बाळापूर तालुक्यातील पारस येथील अनिल राऊत याने दोन समाजामध्ये धार्मिक तेढ निर्माण होईल, अशा पद्धतीने कोरोना विषाणू संसर्ग संदर्भात व्हॉट्स अ‍ॅपद्वारे आक्षेपार्ह पोस्ट प्रसारित केल्यामुळे बाळापूर पोलिसांनी अनिल पांडुरंग राऊत, गजानन साहेबराव राऊत (५0 रा. लेबर कॉलनी, तारफैल) यांच्यासह ११ जणांविरुद्ध विविध कलमांनुसार शनिवारी गुन्हा दाखल करून दोघांना अटक करण्यात आली.कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी अकोला जिल्ह्यात जिल्हाधिकारी यांनी कलम १४४ जाफौनुसार जमावबंदी आदेश लागू केला आहे. असे असतानाही पारस येथे काही लोक बेकायदेशीरपणे जमाव जमवताना निदर्शनात आले. त्यामुळे बाळापूर पोलिसांनी शाकिरअली आबिदअली सय्यद (२९), सय्यद आजम सय्यद रसूल (३0), आमिनखान हमीदखान (६७), मोहम्मद जफर मो. रफिक, अमिनोद्दिन मोहम्मद इस्लाम (४३), इरफान खान बिस्मिल्ला खान (४१), बिलालखान जलालखान (४७), जमील अहमद अब्दुल अहमद (६५), शेरू पठाण हारून पठाण (३१) सर्व राहणार पारस अशा भादंवि कलम १४३, १४९, १८८ सहकलम ३६ (३) १३५ मपोकानुसार गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. तसेच अनिल राऊत व गजानन राऊत यांच्याविरुद्ध भादंवि कलम २९५ अ, ५०५ (२) सहकलम ५४ आपत्ती व्यवस्थापन कायदा गुन्हा दाखल करून व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपचा अ‍ॅडमिन आणि व्हॉट्स अ‍ॅपवर पोस्ट प्रसारित करणारा इसम अशा दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. पारस येथे दोन समाजामध्ये जातीय तेढ निर्माण होऊन अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पारस येथे कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाSocial Mediaसोशल मीडियाCrime Newsगुन्हेगारी