शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

लाचखोर कृषी सहायकासह पतीविरुद्ध गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2020 12:07 IST

ललिता इंगोले- तायडे आणि त्यांचा पती धम्मपाल तायडे या दोघांविरुद्ध बाळापूर पोलीस ठाण्यात गुरुवारी लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अकोला : गोरेगाव येथील एका शेतकऱ्याच्या लिंबाच्या रोपांचे ११ हजार ५०० रुपयांचे मस्टर वरिष्ठांना सादर केल्याच्या मोबदल्यात ५०० रुपयांच्या लाचेची मागणी करणाºया गोरेगाव येथील कृषी सहायक ललिता इंगोले- तायडे आणि त्यांचा पती धम्मपाल तायडे या दोघांविरुद्ध बाळापूर पोलीस ठाण्यात गुरुवारी लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गोरेगाव येथील ३३ वर्षीय शेतकºयाने लिंबू रोपे शेतात लावली असून, या रोपांचे मस्टर वरिष्ठ अधिकाऱ्यांना सादर केल्याच्या मोबदल्यात कृषी सहायक ललिता इंगोले -तायडे यांनी ५०० रुपयांच्या लाचेची मागणी केली. लाच मागणी करण्यासाठी धम्मपाल तायडे यानेही तिला प्रवृत्त केले; मात्र तक्रारकर्त्या शेतकºयास लाच देणे नसल्याने त्यांनी या प्रकरणाची तक्रार अकोलालाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. यावरून अकोला एसीबीने २१ नोव्हेंबर २०१९ रोजी पंचासमक्ष पडताळणी केली असता या दोघांनी लाच मागितल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे लाचेची रक्कम देवाण-घेवाण करण्याचे ठरले असता लाचखोर कृषी सहायक इंगोले व तिच्या पतीला संशय आल्याने त्यांनी लाच घेण्याचे टाळले; मात्र पडताळणीमध्ये लाच मागितल्याचे समोर आल्याने एसीबीने तपास करून या दोघांविरुद्ध बाळापूर पोलीस ठाण्यात लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. हे दोन्ही लाचखोर आरोपी सध्या फरार असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

सहा महिन्यांपूर्वी पडताळणीपडताळणी नोव्हेंबर २०१९ मध्ये करण्यात आली होती; मात्र लाच घेण्याचे टाळल्याने अकोला एसीबीला या प्रकरणाचा तपास करावा लागला. त्यानंतर सदर प्रकरणात दोघांविरुद्ध आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Anti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागAkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारी