शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
2
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
3
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ
4
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
5
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
6
Air India Plane Crash: विजय रुपाणींचा हा खरंच अपघातापूर्वीचा फोटो आहे का? जाणून घ्या सत्य
7
Vijay Rupani Death: पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
8
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
9
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
10
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
11
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी
12
दोन तास मी त्याच विमानात होतो, काहीतरी असमान्य वाटत...; दिल्लीहून अहमदाबादला आलेल्या प्रवाशाचे ट्विट
13
सर्वत्र मृतदेह, ओळख पटवणेही अशक्य; गुजरात सरकारकडून डीएनए सॅम्पल देण्याचं आवाहन
14
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...
15
Ahmedabad Plane Crash : पत्नी आणि मुलीला भेटण्यासाठी लंडनला जात होते माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी
16
Ahmedabad Plane Crash: विमानात कोणती सीट सर्वात सुरक्षित? विमानाने प्रवास करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा
17
Air India Plane Crash: ५ महिन्यापूर्वी लग्न, पहिल्यांदाच पतीला भेटायला लंडनला चालली होती पण काळाने घात केला
18
'आम्हाला आत जाऊ द्या', रुग्णालयाबाहेर मृत आणि जखमींच्या नातेवाईकांचा आक्रोश
19
विमानातील कुणीही बचावलं असण्याची शक्यता नाही; सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती! पोलीस आयुक्त म्हणाले...
20
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 

मालगाडीच्या डब्यातील कोळसा पेटला; अकोला रेल्वे स्थानकावर थांबविली  मालगाडी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2017 22:37 IST

अकोला : रेल्वे स्टेशनवरील फलाट क्रमांक १ आलेल्या मालगाडीच्या डब्यातील  कोळशाने पेट घेतल्याचे दिसून आले. यावेळी मालगाडी थांबवून मनपा अग्निशमन  विभागाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाने मालगाडीच्या डब्यातील  पेटलेल्या कोळशावर पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली.

ठळक मुद्देअग्निशमन पथकाने आटोक्यात आणली आगकोळशाने भरलेली मालगाडी अकोला मार्गे खंडव्याकडे जात होती कुरुम रेल्वेस्थानक उप अधीक्षकांच्या लक्षात आली बाबमालगाडी थांबविल्यामुळे मुंबई, पुणे जाणार्‍या गाड्यांचा झाला खोळंबा

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : रेल्वे स्टेशनवरील फलाट क्रमांक १ आलेल्या मालगाडीच्या डब्यातील  कोळशाने पेट घेतल्याचे दिसून आले. यावेळी मालगाडी थांबवून मनपा अग्निशमन  विभागाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाने मालगाडीच्या डब्यातील  पेटलेल्या कोळशावर पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली. रेल्वे मालगाडी  थांबविल्यामुळे नागपूरकडून मुंबई, पुणेकडे जाणार्‍या रेल्वेगाड्या काहीवेळ थांबवून  ठेवण्यात आल्या होत्या. कोळशाने भरलेली मालगाडी खंडवा जाण्यासाठी कुरूम रेल्वे स्टेशनवरून जात अस ताना, स्टेशन उप अधीक्षकांना मालगाडीच्या डब्यामध्ये कोळशातून धूर निघत असल्याचे  दिसून आले. त्यांनी ही माहिती तातडीने भुसावळ येथील नियंत्रण कक्षाला दिली. नियंत्रण  कक्षाने मालगाडीचा चालक व गार्डला मालगाडी अकोला रेल्वे स्टेशनवर थांबविण्याची  सूचना दिली. अकोला रेल्वे स्टेशनवर मालगाडी थांबल्यावर रेल्वे प्रशासनाने मनपा  अग्निशमन विभागाला पाचारण केले.  रेल्वे स्टेशनवर आल्यावर अग्निशमन विभागाच्या  कर्मचार्‍यांनी मालगाडीच्या डब्यातील कोळशावर पाण्याचा मारा करून आग आटोक्यात  आणली. रेल्वे फलाटांवर रेल्वेगाड्यांची प्रतीक्षा करणार्‍या प्रवाशांमध्ये रेल्वेगाडीमध्ये  आग लागल्याची अफवा पसरल्याने, एकच खळबळ उडाली होती.  मालगाडीच्या  डब्यातील कोळसा थंड झाल्यानंतर, ही गाडी भुसावळमार्गे रवाना झाली. (प्रतिनिधी) छाया : 0१ सीटीसीएल : २0 (मालगाडीच्या डब्यातील धुमसणार्‍या कोळशावर  पाण्याचा मारा करताना मनपा अग्निशमन विभागाचे कर्मचारी.)

टॅग्स :Akola Railway Stationअकोला रेल्वे स्थानकfireआग