शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
2
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
3
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
4
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
5
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
6
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
7
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
8
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
9
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
10
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
11
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
12
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
13
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
14
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
15
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
16
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
17
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
18
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
20
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा

राष्ट्रीय महामार्गावर कार-ट्रकची अमोरासमोर धडक; चार जण ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2020 18:15 IST

दोन चिमुकल्यांसह चार जण ठार, तर अन्य तीन जण गंभीर जखमी झाल्याची घटना मुर्तीजापूरजवळ घडली.

ठळक मुद्देकारला नागठाणा गावाजळ विरुद्ध दिशेने जात असलेल्या कंटेनरने जोरदार धडक दिली.या अपघातात दोन चिमुकल्यांचा जागीच मृत्यू झाला.एक पुरुष व महिलेचा उपचारार्थ नेत असताना वाटेत मृत्यू झाला.

मूर्तिजापूर : भरधाव ट्रकने समोरून येणाऱ्या कारला जबर धडक दिली. यात कारमधील एकाच कुटूंबातील चौघे जण जागीच ठार झाले. यात दोन चिमुकल्या मुलांचाही समावेश आहे. ही घटना सोमवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावरील नागोली-नागठणाजवळ घडली. अपघातात तिघे जण गंभीर झाले असून, त्यांना उपचारासाठी अकोल्यातील सर्वोपचार रूग्णालयात दाखल केले आहे.  नागपूर येथून मुंबईला जाण्यासाठी निघालेल्या एमएच 0४-बीडब्ल्यू-५२५९ क्रमांकाच्या कारला समोरून भरधाव येणाºया एमएच १५एफव्ही १४१३ क्रमांकाच्या ट्रकने जबर धडक दिली. ही धडक एवढी जबरदस्त होती की, कारच्या समोरील भागाचा पूर्णत: चुराडा झाला. कारमधील बुराऊद्दीन दिलावर(३५), फातेमा दिलावर(५0 दोन्ही रा. नाशिक) यांच्यासह असलिम(४) आणि बुरहानुद्दीन(६ महिने) हे चौघे जण जागीच ठार झाले तर साबिया हुसैन हबीब हुसैन(३0), हुसैन हबीब मोहम्मद हुसैन(३५) आणि हुसैन गुलाम हुसैन(५0 तिघे रा. मुंबई) हे तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी येथील लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी अकोला येथील रूग्णालयात भरती केले आहे. कार आणि ट्रकचा भिषण अपघात झाला. ट्रकची धडक बसताच,  मृतक कारच्या बाहेर फेकल्या गेले. अपघाताची माहिती मिळताच वंदेमातरम आपत्कालीन पथकाच्या रुग्णवाहिकेतून जखमी व मृतकांना रुग्णालयात आणण्यात आले. अपघातामुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. पोलिसांनी घटनास्थळावर पोहोचून वाहतूक सुरळीत केली. ट्रकचालकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. 

चिमुकले ठार; आई-वडील जखमीकारमधील असलिम व बुरहानउद्दीन हे दोघे चिमुकली मुले जागीच ठार झाली, तर त्यांचे आई-वडील साबिया हुसैन आणि हबीब हुसैन गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना अकोल्यातील रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

टॅग्स :AccidentअपघातAkolaअकोलाMurtijapurमुर्तिजापूरNational Highway No. 6राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6