लोकमत न्यूज नेटवर्कमूर्तिजापूर : भरधाव कारने मिनीडोरला धडक दिल्याने तीन गंभीर जखमी झाले. ही घटना १९ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता मूर्तिजापूर ते अकोला राष्ट्रीय महामार्गावर अनभोरा कुष्ठधामजवळ घडली. पातूर येथून दूध घेऊन मिनीडोर क्र. एमएच ३0 एबी ४७४0 मूर्तिजापूरकडे येत हो ते. राष्ट्रीय महामार्गावरील अनभोरा कुष्ठधामजवळ मोर्शी येथून शेगावकडे जात असलेल्या कार क्र. एमएच२७ बीव्ही ३५७४ ने मिनीडोरला धडक दिली. या अ पघातात मिनीडोरचा चालक सतीश मालटे, नामदेव राठोड व जवळेकर हे गंभीर जखमी झाले. बिहार राज्यातील रहिवासी व मोर्शी येथे बँक आफ इंडिया येथे व्यवस्थापक पदावर कार्यरत असलेले संतोष कुमार व त्यांची पत्नी व एक बाळ आदी किरकोळ जखमी झाले. गंभीर जखमींना तातडीने मूर्तिजापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले, तसेच तेथून पुढील उपचारासाठी अकोला येथे पाठविण्यात आले. घटनेची माहिती मिळताच मूर्तिजापूर पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेऊन वाहतूक सुरळीत केली. पुढील तपास मूर्तिजापूर पोलीस करीत आहेत.
कारची मिनीडोरला धडक; तीन गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2017 20:16 IST
मूर्तिजापूर : भरधाव कारने मिनीडोरला धडक दिल्याने तीन गंभीर जखमी झाले. ही घटना १९ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता मूर्तिजापूर ते अकोला राष्ट्रीय महामार्गावर अनभोरा कुष्ठधामजवळ घडली.
कारची मिनीडोरला धडक; तीन गंभीर
ठळक मुद्देराष्ट्रीय महामार्गावर अनभोरा कुष्ठधामजवळ घडली घटनागंभीर जखमींवर अकोला येथे उपचार सुरू