शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

अकोल्यात चोरलेल्या मोटारसायकलसह नागपुरात सापडली कार

By नितिन गव्हाळे | Updated: September 19, 2023 19:33 IST

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई ; आरोपीला अटक

नितीन गव्हाळे

अकोला : रामदास पेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतून चोरलेल्या मोटारसायकली नागपुरातील गांधीबाग परिसरात आढळून आल्या आहेत. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपींना जेरबंद करीत, त्यांच्याकडून एक चारचाकी व दोन दुचाकी असा पाच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई मंगळवारी दुपारी केली.

गत काही महिन्यांपासून शहरातील विविध भागातून चारचाकी, दुचाकी वाहने चोरीला जात असल्याच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी चोरट्यांना जेरबंद करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक शंकर शेळके यांनी पथकाला दुचाकी चोरणारी टोळीचा शोध घेण्याबाबत सूचना दिल्या.

एलसीबी पथकाने १८ सप्टेंबररोजी नागपूर येथून दोघांना ताब्यात घेतले. यात भालदारपुरा गांधीबाग, नागपूर येथील नोमान अखलाक अहमद (२०) आणि शेख अमजत शेख आजम (१९) यांचा समावेश होता. शेख अमजत हा अकोल्यातील वाशिम बायपास परिसरातील हमजा प्लॉट येथील रहिवाशी असून, सध्या नागपुरात रहिवाशी आहे. या दोन्ही आरोपीकडून चार लाख रुपये किंमतीची एक टाटा एसव्ही (एमएच ३० एबी १७५९), दुचाकी (एमएच ३० बी ३६९४), (एमएच ३० बीजे ८६६३) क्रमांकाची असा एकूण पाच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई पोलिस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर पोलिस अधीक्षक अभय डोंगरे यांच्या मार्गदर्शनात पीएसआय गोपाल जाधव, एएसआय दशरथ बोरकर, फिरोज खान, उमेश पराये, गोकुळ चव्हाण, प्रमोद डोईफोडे, भास्कर धोत्रे, खुशाल नेमाडे, आकाश मानकर, धीरज वानखडे, मोहम्मद आमीर, अभिषेक पाठक, अन्सार अहेमद, लिलाधर खंडारे, स्वप्नील खेडकर, स्वप्निल चौधरी, प्रसांत लोखंडे, सायबर पोलिस आशिष आमले आदींनी केली.फोटो:

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAkolaअकोलाPoliceपोलिस