अकोला: डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ परिसरातून चोरी गेलेल्या चंदनाच्या झाडाची ५ जानेवारी रोजी सुरक्षा विभागाच्यावतीने पाहणी करण्यात आली. त्यानंतर याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील चंदनाच्या झाडाची कत्तल करून रविवारी चोरी करण्यात आली होती. मुख्य प्रवेशद्वारापासून व कुलगुरू कार्यालयापासून २00 मीटर अंतरावर असलेल्या या झाडाच्या चोरीचे वृत्त ह्यलोकमतह्णने प्रकाशित केल्यावर विद्यापीठातील सुरक्षा विभागाची झोप उडाली. त्यानंतर याबाबत विद्यापीठातील वरिष्ठ अधिकार्यांशी विचारणा केली असता त्यांनी सदर वृक्ष चंदनाचे नसून, बाभळीचे असल्याची माहिती दिली. सुरक्षा विभागाच्यावतीनेही सुरुवातीला सदर वृक्ष बाभळीचे असल्याचे सांगण्यात आले. मात्र, प्रत्यक्ष झाड तुटलेल्या ठिकाणची पाहणी केल्यावर सुरक्षा विभागाच्या अधिकार्यांनी सदर वृक्ष चंदनाचेच असल्याचे सांगितले. सदर झाड रविवारीच तोडण्यात आले असून, त्या ठिकाणी त्या झाडाची पानेही पडलेली आहेत. मात्र, प्रत्यक्ष पाहणी होईपयर्ंत आपल्या अंगावरील घोंगडे झटकण्यासाठी सुरक्षा विभागाचे अधिकारी सदर झाड चंदनाचे नसून, बाभळीचे असल्याचे सांगत होते. चंदनाच्या वृक्षाची चोरी कशी झाली, याची चौकशी करण्यात येणार असल्याचे सुरक्षा विभागप्रमुख व्ही. वाय. मानकर यांनी सांगितले. सदर प्रकरणाची पोलिसात तक्रारही दाखल करण्यात येणार आहे.
चंदनाचे झाड चोरीची तपासणी
By admin | Updated: January 6, 2015 01:38 IST