शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

कॅनॉल रोडच्या हस्तांतरणासाठी मुहूर्त सापडेना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 01:56 IST

अकोला : जुने शहरातील डाबकी रोड ते बाळापूर रोडपर्यंतच्या  कॅनॉल रस्त्याची दुर्दशा झाली आहे. पाटबंधारे विभागाच्या अख त्यारीत असलेल्या कॅनॉलची जागा रस्त्यासाठी हस्तांतरित  करण्याचे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांना अधिकार  आहेत. मागील दोन वर्षांपासून ही जागा मिळवण्यासाठी महा पालिका प्रशासनाची धडपड सुरू असली, तरी अद्यापही जिल्हा  प्रशासनाने जागेच्या हस्तांतरणाचा निर्णय घेतला नाही.  

ठळक मुद्देमनपा ‘वेटिंग’वरजिल्हाधिकार्‍यांच्या भूमिकेकडे लक्ष

आशिष गावंडे । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जुने शहरातील डाबकी रोड ते बाळापूर रोडपर्यंतच्या  कॅनॉल रस्त्याची दुर्दशा झाली आहे. पाटबंधारे विभागाच्या अख त्यारीत असलेल्या कॅनॉलची जागा रस्त्यासाठी हस्तांतरित  करण्याचे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांना अधिकार  आहेत. मागील दोन वर्षांपासून ही जागा मिळवण्यासाठी महा पालिका प्रशासनाची धडपड सुरू असली, तरी अद्यापही जिल्हा  प्रशासनाने जागेच्या हस्तांतरणाचा निर्णय घेतला नाही.  नगरविकास राज्यमंत्री तथा पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी  कॅनॉल रस्त्यासाठी सहा कोटींची तरतूद केली असताना जिल्हा  प्रशासन व महापालिकेला कॅनॉलच्या हस्तांतरणासाठी मुहूर्त सा पडत नसल्यामुळे आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.अकोला पश्‍चिम विधानसभा मतदारसंघातील सर्वाधिक दाट  लोकवस्तीचा भाग म्हणून जुने शहराकडे पाहिल्या जाते. जुने  शहरात डाबकी रोड, जुना बाळापूर रोड व हरिहरपेठ मार्गाचा  प्रमुख रस्ते म्हणून वापर होतो. सर्वाधिक वर्दळ डाबकी रोडवर  राहत असून, अरुंद रस्त्यामुळे वाहतूक विस्कळीत होण्याचे  प्रकार दैनंदिन झाले आहेत. जुने शहरातील वाहतूक  वळवण्यासाठी कॅनॉल रस्त्याचा एकमेव पर्याय आहे. डाबकी  रोड ते जुना बाळापूर रोडपर्यंत १ हजार ३00 मीटर अंतराच्या  कॅनॉल रस्त्यासाठी मनपाचे तत्कालीन आयुक्त दीपक चौधरी  यांच्या कालावधीत निविदा प्रकाशित करण्यात आली होती.  त्यावेळी प्रशासनाने १ कोटी ६0 लाख रुपयांची तरतूद केली हो ती. पाटबंधारे विभागाच्या अखत्यारीत असलेल्या कॅनॉलची  जागा रस्ते विकासासाठी मनपाकडे हस्तांतरित होणे गरजेचे होते.  यासंदर्भात मनपा प्रशासनाने पाटबंधारे विभाग आणि  जिल्हाधिकार्‍यांकडे वारंवार पाठपुरावा केला. कॅनॉल रस्त्याची जागा मनपाकडे हस्तांतरित करण्याचे  जिल्हाधिकार्‍यांना सर्वाधिकार आहेत. जुने शहरातील वाह तुकीची समस्या ध्यानात घेता याविषयी जिल्हा प्रशासनाने ता तडीने निर्णय घेण्याची गरज आहे. 

सहा कोटींची तरतूद केली पण..जुने शहरातील अरुंद रस्ते, वाहतुकीची कोंडी पाहता  नगरविकास राज्यमंत्री तथा पालकमंत्री डॉ.रणजित पाटील यांनी  वर्षभरापूर्वी डाबकी रोड ते जुना बाळापूर रोड ते थेट राष्ट्रीय  महामार्गावरील नवीन किराणा मार्केटपर्यंंत रस्ता तयार  करण्यासाठी सहा कोटी रुपयांची तरतूद केली. पालकमंत्र्यांनी  निधीची तरतूद केल्यावरही जिल्हा प्रशासन व मनपा  प्रशासनाकडून रस्ते हस्तांतरणाच्या प्रक्रियेला विलंब होतोच  कसा, असा प्रश्न उपस्थित होत आहे. प्रशासकीय यंत्रणांचा  लेटलतिफ कारभार पाहता सहा कोटींचा निधी इतरत्र वळती  करण्याच्या हालचाली सुरू झाल्याची माहिती आहे. 

कॅनॉल अस्तित्वात नाही, तरीही विलंब!शेतकर्‍यांना सिंचनासाठी उपलब्ध करून दिलेल्या कॅनॉलचे  अस्तित्व कधीचेच संपुष्टात आले आहे. कॅनॉलच्या दोन्ही  बाजूने आता रहिवासी वस्ती आहे. सुमारे १00 फुट रुंदीच्या  कॅनॉलच्या जागेवर स्थानिकांनी दोन्ही बाजूने अतिक्रमण केले  आहे. अतिक्रमणाची समस्या पाहता पाटबंधारे विभाग तसेच  जिल्हा प्रशासनाने ही जागा मनपाकडे तातडीने हस्तांतरित क  रण्याची गरज आहे.-