शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
3
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
4
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
5
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
6
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
7
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
8
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
9
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
10
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
11
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
12
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
13
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
14
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
15
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
16
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
17
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
18
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
19
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
20
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?

कॅल्शियम कार्बाइडने कर्करोगासह अनेक आजारांचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2019 12:33 IST

कर्करोग, पोट बिघडणे यासह मज्जासंस्थेवर प्रभाव होत असल्याने हे फळ आरोग्यासाठी प्रचंड घातक असल्याची माहिती आहे.

- सचिन राऊत

अकोला: कॅल्शियम कार्बाइड, इथिलीन स्प्रे अन् पावडर याचा आंबा, केळी, टमाटर आणि पपई यासारखी फळे पिकविण्यासाठी आणि त्याला विशिष्ट रंग येण्यासाठी सर्रास वापर होत असून, ही फळे नागरिकांच्या आरोग्यासाठी प्रचंड घातक असल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली. कृत्रिमरीत्या पिकविलेली फळे खाल्ल्यानंतर त्याचे दुरगामी परिणाम होत असून, कर्करोग, पोट बिघडणे यासह मज्जासंस्थेवर प्रभाव होत असल्याने हे फळ आरोग्यासाठी प्रचंड घातक असल्याची माहिती आहे. हे आहेत विषारी घटककॅल्शियम कार्बाइडमध्ये फॉस्फरस हायड्राइड आणि आर्सेनिक हे विषारी घटक आहेत. तर इथिलीनमध्ये हायड्रोकार्बन वायू असून, याचेही काही दुष्परिणाम असल्याची माहिती आहे. या आजारांचा धोकाकर्करोग, पोट बिघडणे, मज्जासंस्थेवर प्रभाव करणे, मलेरिया, डायरिया, तोंडात फोड येणे, डोकेदुखी, मूड खराब होणे, स्मृतिभ्रंश होणे आणि झोप येणे यासारखे गंभीर आजार उद्भवण्याची शक्यता आहे. त्यामुळे कॅल्शियम कार्बाइड हे प्रचंड धोकादायक आहे. आरोग्यावर दीर्घकाळाने परिणामकॅल्शियम कार्बाइड तसेच इथिलीनचे प्रमाणापेक्षा अधिक वापर झालेली फळे खाल्ल्यानंतर शरीरावर त्याचे दीर्घकाळाने परिणाम जाणवतात. ज्या प्रमाणे गुटखा खाणाऱ्यास त्याचे वाईट परिणात बºयाच वर्षानंतर जाणवतात तसेच कॅल्शियम कार्बाइड आणि इथिलीनच्या अधिक वापराची फळे खाल्ल्यानंतर जाणवत असल्याचे अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. कृत्रिमरीत्या पिकविलेली फळे ओळखणे कठीणचकॅल्शियम कार्बाइडने पिकविलेली आणि इथिलीन स्प्रे किंवा पावडरने रंग आलेली फळे ओळखणे फार कठीण असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाºयांनी दिली; मात्र अशा प्रकारे पिकविलेला आंबा खाताना तोंडात किंचित जळल्याची जाणीव होते. तर कृत्रिमरीत्या फळ पिकविताना रंगेहात पकडणे आणि सदर फळ व कॅल्शियम कार्बाइडचे नमुने घेऊन तपासणी करणे हाच पर्याय असल्याची माहिती आहे. गरम आणि गॅसमुळे पिकतात फळकॅल्शियम कार्बाइडची एक पुडी बांधून गोदामात ठेवल्यानंतर त्याचा प्रचंड गॅस तयार होतो तसेच तापमानही वाढते. त्यामुळे एक आंबा सुरुवातीला पिकतो व त्या गॅसद्वारे गोदामातील आंबे काही दिवसात, तर काही तासातच पिकतात. कमी तापमान असलेल्या ठिकाणी याचा वापर अधिक प्रमाणात होत असल्याचेही वास्तव आहे. यामध्ये कोकण या भागात याचा वापर जास्त होतो.

 

टॅग्स :AkolaअकोलाHealthआरोग्यfruitsफळे