शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

नाेंदणी केली ना? मग हरबरा खरेदी करा! अन्यथा कार्यालयाला कुलूप ठाेकणार; ठाकरे गटाचा इशारा

By राजेश शेगोकार | Updated: April 25, 2023 18:02 IST

बाजार समितीत गत चार-पाच दिवसांत क्विंटलमागे ३०० रुपयांनी हरभऱ्याचे भाव पडले आहेत.

अकाेला : हरभरा खरेदीसाठी असलेले नाफेडचे जिल्हा पोर्टलच दोन दिवसांपासून बंद करण्यात आल्याने जिल्ह्यातील खरेदी केंद्रांना टाळे लागले आहेत. त्यामुळे व्यापाऱ्यांचे फावले असल्याचे चित्र आहे. बाजार समितीत गत चार-पाच दिवसांत क्विंटलमागे ३०० रुपयांनी हरभऱ्याचे भाव पडले आहेत. त्यामुळे आक्रमक हाेत शिवसेना ठाकरे गटाने मंगळवारी विदर्भ सहकारी विपनन महासंघाच्या कार्यालयात ठिय्या दिला. नाेंदणी केलेल्या शेतकऱ्यांकडून हरबरा खरेदी करा अन्यथा कार्यालयाला कुलूप ठाेकू असा इशारा यावेळी देण्यात आला. 

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आमदार नितीन देशमुख यांच्या नेतृत्वात पदाधिकारी व शिवसैनिकांनी विदर्भ सहकारी विपनन महासंघाच्या कार्यालयात धडक दिली. केंद्र शासनाने हरभऱ्यासाठी यंदा ५,३३५ रूपये क्विंटल हमीभाव जाहीर केला. खरेदी सुरू झाल्यापासून नाफेडद्वारा साधारणपणे चार लाख क्विंटल हरभऱ्याची खरेदी करण्यात आली आहे. नाफेडद्वारे जिल्ह्यातील एकूण हरभरा उत्पादनाच्या २५ टक्के हरभरा खरेदीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. ते पूर्ण झाल्याने आता खरेदी केंद्र बंद करण्यात आली आहेत. त्यामुळे अडचणीतील शेतकऱ्यांना खासगीमध्ये हरभरा विक्री करण्याशिवाय पर्याय उरला नाही. यामध्ये दर पडल्याने आता शेतकऱ्यांची लूट होत आहे. असा आराेप त्यांनी केला त्यामुळे नाेंदणी केलेल्या शेतकऱ्यांकडून हरबरा खरेदी करा अशी मागणी त्यांनी लावून धरली.

यावेळी जिल्हाप्रमुख गाेपाल दातकर, अकाेला पूर्व मतदारसंघाचे प्रमुख राहुल कराळे, उपजिल्हाप्रमुख याेगेश्वर वानखडे, सुरेंद्र विसपूते,  ज्ञानेश्वर गावंडे, पवन पवार, राजेश टाेहरे, साेनु भरकर ,भास्कर अंभाेरे, जिवन राऊत, गजानन मानवतकार, उमेश राऊत ,धिरज पवार आदींची उपस्थित हाेते.

पणन सचिवांसाेबत संवाद आ.देशमुख यांनी थेट पणनचे  सचिव अनुप कुमार यांच्याशी माेबाईल फाेनवरून संपर्क साधत शेतकऱ्यांच्या प्रश्नावर धारेवर धरले. नाफेडची खरेदी बंद झाल्याने गत चार दिवसांपूर्वी ४ हजार ७०० रूपये प्रति क्विंटल असलेला हरभरा सोमवार, दि.२४ एप्रिल रोजी ४ हजार ३५० प्रति क्विंटल विक्री झाला असल्याचे सांगत हे शेतकऱ्यांच्या विराेधात षडयंत्र असल्याचा आराेप त्यांनी केला. हरबरा खरेदी न केल्यास पुढील आठवडयात कार्यालयाला कुलूप ठाेकण्याचा इशाराही त्यांनी सचिवांना दिला.

टॅग्स :FarmerशेतकरीAkolaअकोला