शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

एलबीटी रिटर्नबाबत व्यापाऱ्यांना नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2019 15:48 IST

अकोला: एलबीटी, व्हॅटला निरोप देत शासनाने जीएसटीची अंमलबजावणी केली असली तरी अजूनही मागील करभरणा आणि रिटर्नचा ससेमिरा अद्याप सुटलेला नाही.

अकोला: एलबीटी, व्हॅटला निरोप देत शासनाने जीएसटीची अंमलबजावणी केली असली तरी अजूनही मागील करभरणा आणि रिटर्नचा ससेमिरा अद्याप सुटलेला नाही. अकोला शहरात व्यापार-उद्योग करणाऱ्यांना २०१४ च्या एलबीटी रिटर्नबाबतच्या नोटिसेस मिळत आहे. तत्कालीन यंत्रणा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अख्त्यारीत होती. म्हणून आता स्थानिक संस्थेकडून व्यापाºयांना नोटीसेस पाठविल्या गेल्या आहेत.२०१४ मध्ये एलबीटी (स्थानिक संस्था कर) वसूल करण्याचे अधिकार अकोला महापालिकेस होते. अनेक व्यापारी-उद्योजकांनी नियमित एलबीटीचा भरणा केला. दरम्यान, एलबीटी रिटर्नही भरले. २०१४ मध्ये झालेल्या व्यवहारप्रकरणी आता अकोला महापालिकेच्या वतीने नोटीस पाठवून यासंदर्भात विचारणा केली जात आहे. वास्तविक पाहता, चार वर्षाआधीचा रेकॉर्ड आणि त्याचे दस्ताऐवज पडताळण्याची जबाबदारीदेखील स्थानिक संस्थेची होती; मात्र तेव्हा पडताळणी आणि पाहिजे तशी चाचपणी केली गेली नाही. आता एलबीटीच्या रिटर्नबाबत नोटीस पाठवून व्यापाºयांना स्पष्टीकरण सादर करण्याचे निर्देश दिले जात आहे. मनपाच्या या निर्देशामुळे व्यापाºयांमध्ये संताप व्यक्त होत आहे. वास्तविक पाहता, जीएसटीच्या एक कर प्रणालीखाली सर्व यंत्रणा आणली गेली; मात्र मागील प्रलंबित असलेल्या एलबीटी आणि व्हॅटचे रेंगाळत असलेले प्रकरण अजूनही ‘जैसे थे’ आहे. व्हॅटचा निपटारा करण्यासाठी जीएसटीने मोहीम राबविली. त्यासाठी विशिष्ट मुदत देण्यात आली आहे. आता मागील एलबीटी आणि रिटर्नच्या रेंगाळत असलेल्या प्रकरणी स्थानिक स्वराज्य संस्थांकडून मोहीम राबविली जात आहे. त्यासाठी, अकोल्यातील व्यापारी-उद्योजकांना नोटीसेस बजाविण्यात आल्या आहेत. अकोल्यातील शेकडो व्यापाºयांना २०१४ च्या प्रकरणात नोटीस मिळाल्याने ते हादरले आहे. व्यापाºयांनी संबंधित तारखेवर उपस्थित राहावे, असे आवाहन मनपाच्या एलबीटी अधीक्षकांनी आवाहन केले आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिकाTaxकर